आकांक्षा रिहॅबिलीटेशन सेंटरमधील दोन दिव्यांग दांपत्यांना रोटरी क्लब ऑफ मुंबई माहिमच्या वतीने आटाचक्की प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

आकांक्षा रिहॅबिलीटेशन सेंटरमधील दोन दिव्यांग दांपत्यांना रोटरी क्लब ऑफ मुंबई माहिमच्या वतीने आटाचक्की प्रदान

आकांक्षा रिहॅबिलीटेशन सेंटरमधील दोन दिव्यांग दांपत्यांना रोटरी क्लब ऑफ मुंबई माहिमच्या वतीने आटाचक्की प्रदान

रोटरी क्लब ऑफ मुंबई माहिमच्या वतीने दिव्यांगाना आथिकदृष्टया स्वावलंबी बनण्याचा उत्कृष्ट पर्याय प्रवीण बजाज 


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः  दिव्यांग व्यक्तीना आपल्यातील गुण वेगळया पध्दतीने मांडण्याकरीता मार्गदशन हवे असते ते काम आकांक्षा करत आहे कोणत्या प्रकारची अपेक्षा न करत असलेले काम हे निश्चितच कौतुकास्पद आहे.गेल्या 15 वर्षापासून आकांक्षा यांना आत्मनिभर करण्याचे काम करत आहेत दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आकांक्षा करत आहे याकरीता रोटरी क्लब ऑफ मुंबई माहिमच्या वतीने दिव्यांगाना आथिकदृष्टया स्वावलंबी बनण्याचा उत्कृष्ट पर्याय दिला आहे.असे प्रतिपादन हायटेक इंडस्ट्रीजचे संचालक व सुप्रसिध्द उदयोजक प्रवीण बजाज यांनी केले.आकांक्षा रिहॅबिलीटेशन सेंटरमधील दोन दिव्यांग दांपत्यांना रोटरी क्लब ऑफ मुंबई माहिमच्या वतीने आटाचक्की प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष हायटेक इंडस्ट्रीजचे संचालक व सुप्रसिध्द उदयोजक प्रवीण बजाज हे होते. प्रमुख अतिथी रोटरी क्लब ऑफ मुंबई माहिमचे व आकांक्षा रिहॅबिलीटेशन सेंटरचे विश्वस्त आनंद लिमये  सौ.सरिता बजाज, आकांक्षा रिहॅबिलीटेशन सेंटरचे अध्यक्षा सौ. सविता काळे, आकांक्षा रिहॅबिलीटेशन सेंटरचे सचिव हेमंत काळे  आदी मान्यवर उपस्थित होते. बजाज  पुढे म्हणाले की,दिव्यांगात आत्मविश्वास निर्माण करणे तसेच कामात सातत्य ठेवणे तसेच दिव्यांग कुटुंबालाही मदत कशी करता येइल तसेच त्यांचे उत्पन्न कसे वाढेल हे काम ग्लोबल वर्क आहे. बोलणारे खूप आहेत प्रत्यक्षात कृती करणारे कमी आहेत सविता काळे व हेमंत काळे यांचे काम फार मोठे आहे. सात्विक विचाराची ही मंडळी हे काम करत आहेत. या जगात दान देणारे खूप आहेत पण वेळ देणारे कमी आहेत काळे यांच्या कामात कोणत्याही प्रकारचा दिखावपणा नसून काम करून दाखवत आहेत. आनंद लिमये  म्हणाले की, रोटरी क्लब ऑफ मुंबई माहिम हे नेहमीच समाजातील उपेक्षित घटकांकरीता काम करत असते दिव्यांगाना आथिकदृष्टया स्वावलंबी बनण्याकरीता हा पर्याय आहे. दिव्यांग स्वत:च्या पायावर या माध्यमातुन उभा राहील.दिव्यांग लोकांना सहानुभूती नको आहे तर त्यांना काम पाहिजे आहे कोणतेही दान हे सत्पात्री दान असावे ते आमच्याकडे चालत आले आमच्या या मदतीतून दोन्ही दांम्पत्य चीज करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सविता काळे म्हणाल्या की,आकांक्षा गेली 20 वर्षे वाटचाल करत आहे.संधी दया सहानभुती नको हे बीदवाक्य घेउन हे सेंटर काम करत आहे.दुर्दम इच्छाशक्ती व जिदद  जोरावर दिव्यांग उपजत प्रयत्न करत असतात. त्यांना थोडे कौशल्य व प्रामाणिक प्रयत्न यांची जोड देउन आकांक्षा सेंटर उभे राहीले आहे. समाजातील दिव्यांगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे हा या आकांक्षाचा उददेश आहे. आकांक्षाच्या या प्रयत्नात अनेकांचे योगदान आहे.दिव्यांग जगन लोखंडे म्हणाला की, आम्ही आयुष्यात वेगवेगळया बरेवाईट क्षण आले परंतू चांगले प्रसंगात हुरळून गेलो नाही तर वाईट प्रसंगात रडत बसलो नाही आकांक्षा ने संधी दिली. पैसे दिले नाही तर संधी दिली उपजीविकेचे साधन दिले जेणेकरून आम्ही आमच्या पायावर उभे राहीलो. सौ.राधिका जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.आटाचक्की लाभार्थी दिव्यांग दांपत्य वाटेफळ येथील जगन व सौ मंगल लोखंडे व नगरमधील घनश्याम प सौ.राधिका जाधव यांना देण्यात आली.सौ. सविता काळे यांना प्रास्ताविक केले.पाहुण्याचा परीचय हेमंत काळे यांनी करून दिला.आभार सौ. स्मिता क्षीरसागर यांनी मानले.सुत्रसंचालन अंजली सुर्यवंशी यांनी केले.

No comments:

Post a Comment