समर्थ शाळेचे मुख्याध्यापक दुर्योधनकासार यांना उजेडाचे मानकरी सन्मानप्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

समर्थ शाळेचे मुख्याध्यापक दुर्योधनकासार यांना उजेडाचे मानकरी सन्मानप्रदान

 समर्थ शाळेचे मुख्याध्यापक दुर्योधनकासार यांना उजेडाचे मानकरी सन्मानप्रदान

स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाओ या देशव्यापी चळवळीत करत असलेल्या कार्यात सहभागाबददल समर्थ शाळेचे मुख्याध्यापक दुर्योधन कासार यांना उजेडाचे मानकरी  सन्मान प्रदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः डॉ. सुधा कांकरीया संचलित स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाओ या देशव्यापी चळवळीला 35 वर्षे पूर्ण होत आहेत व कांकरीया यांना 60 वर्षे पुण होत आहे त्यांच्या या कार्यात सहभागी संस्था व व्यक्तींत सावेडीतील श्री समर्थ विदया प्रसारक मंडळाची श्री समर्थ विदया मंदिर प्रशालेचे (प्राथमिक  विभाग) मुख्याध्यापक दुर्योधन कासार यांचा उजेडाचे मानकरी  सन्मान जिल्हाधिकारी डॉ..राजेंद्र भोसले  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री राहिबाई पोपेरे, डॉ.सुधा कांकरिया आदी मान्यवर उपस्थित होते. कासार यांनी सातत्याने स्त्री जन्माचे स्वागत करताना दिवाळी भेट कार्यक्रमात अनाथ अंध तसेच दिव्यांगा विदयाथी,गरीब व अनाथ, धुणीभांडी करणार्‍या स्त्रियाकरीता दरवर्षी दिवाळीनिमित्त साडीचोळी ,कपडे व मिठाई देउन गौरव करतात. कासारवाडी गावात जलसंधारणाचे काम,तसेच स्त्रीजन्माचे स्वागत करा डॉ सुधा कांकरीया  यांच्या संकल्पानुसार दरवर्षी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात पालक व शिक्षक कुटुंबात कन्यारत्न जन्माला आले असेल अश्या मातापिता व छोटया पणतीचा यथोचित सन्मान करण्यात येतो.  लग्न समारंभातही सात फेर्‍याबरोबरच स्त्री जन्माचे स्वागत करा हा आठवा फेराही घेण्यास मदत केली. श्री समर्थ विदया प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शंकर व्यापारी, उपाध्यक्ष भालचंद्र जोशी, चेअरमन हरिभाऊ इनामदार, व्हा. चेअरमन दत्तात्रय कुलकर्णी, सचिव लक्ष्मीकांत सोनटक्के, सचिव प्रभाकर ओहोळ, खजिनदार सतिशचंद्र कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड.किशोर देशपांडे, श्रीपाद कुलकर्णी विकास सोनटक्के, स्वप्निल कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश क्षीरसागर, समर्थ शाळेचे प्राचार्या ( माध्यमिक  विभाग ) संगीता जोशी आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment