सावेडी परिसरात ड्रेनेज लाईन टाकणे तसेच रस्ता काँक्रिटिकरण करणे कामाचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

सावेडी परिसरात ड्रेनेज लाईन टाकणे तसेच रस्ता काँक्रिटिकरण करणे कामाचा शुभारंभ

 सावेडी परिसरात ड्रेनेज लाईन टाकणे तसेच रस्ता काँक्रिटिकरण करणे कामाचा शुभारंभ

ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल : महापौर वाकळे


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः
एकता चौक प्रेमदान हडको, सावेडी परिसरात ड्रेनेज लाईन टाकणे तसेच रस्ता काँक्रिटिकरण करणे कामाचा नारळ फोडून शुभारंभ करताना मा.महापौर श्री बाबासाहेब वाकळे. समवेत नगरसेवक मा.श्री रविंद्र बारस्कर, नगरसेविका मा.सौ वंदनाताई ताठे,  मा.श्री उदय कराळे मा.श्री.काशिनाथ लाखे, मा.श्री.राजेंद्र भालारे, मा.श्री.ईश्वर गांधी, मा.श्री.किसन यंगलदास, मा.श्रीमती रोहिणीताई राऊत, मा.श्रीमती अलकाताई भांड  आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
    यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्हणाले की, एकता चौक प्रेमदान हडको परिसरात ब-याच दिवसा पासून ड्रेनेजचा प्रश्न प्रलंबित होता. परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली होती. तसेच या भागातील नगरसेवकांनी माझेकडे सदर ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकणे तसेच रस्ता कॉक्रीटीकरण करणे बाबत पाठपुरावा केला होता. ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील नागारिकांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तसेच सदरील भागात ओपन स्पेस असून सदरील ओपन स्पेस लवकरच विकसीत करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.
     या भागामध्ये विकास कामे प्रस्तावित केलेली आहेत. त्यामुळे या भागातील नागरी सुविधेची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. याभागासह शहर व उपनगरातील नागरिकांची आवश्यक असणारी नागरी सुविधेची कामे करण्यात येत आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे मा.शासनाकडून निधी मनपास या आर्थिक वर्षामध्ये मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांची नागरी सुविधेची कामे करण्यास अडचण निर्माण झालेली आहे. असे असूनही मनपाच्या उपलब्ध निधीतून आवश्यक त्या ठिकाणी विकास कामे करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment