शिक्षण मंत्रालयाच्या वतीने डॉ. अमोल बागुल यांचे चर्चासत्र - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

शिक्षण मंत्रालयाच्या वतीने डॉ. अमोल बागुल यांचे चर्चासत्र

 शिक्षण मंत्रालयाच्या वतीने डॉ. अमोल बागुल यांचे चर्चासत्र


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने येथील जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार व दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक डॉ.अमोल बागुल यांचे क्रीडा व योग शिक्षणातील अध्यापन ,आंतरराष्ट्रीय संधी या विषयावर ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.बागूल यांच्या वतीने करण्यात येत आहे.
    शनिवार दि. 26 डिसेंबर दुपारी 4वाजता गुगल मीटवर संपन्न होणार्‍या या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये योगाची ऑलम्पिक मध्ये निवड, क्रीडा व योग अध्यापन, आंतरराष्ट्रीय संधी, कौशल्य व्यवसायातील स्वरूप, यासंबंधी असलेले विविध प्स, वेबसाइट्स व सोशल मीडियातील महत्त्वाच्या लिंक्स याविषयी बागुल मार्गदर्शन करणार आहेत.  तरी जास्तीत जास्त शिक्षकांनी या ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभागी व्हावे तसेच याविषयी काही प्रश्न असल्यास आपण 9595 54 5555 या व्हाट्सअप क्रमांकावर किंवा रोश्रलरर्सीश्र3सारळश्र.लेा या जीमेलवर  वेबिनारआधी पाठवू शकतात किंवा संपर्क साधू शकता. हिंदी व इंग्रजी भाषेत हे चर्चासत्र संपन्न होणार असून गुगल मीटसह फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम, टेलिग्राफ, टम्बलर,जी मेल या सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठांवर देखील याविषयी महत्त्वाची माहिती टाकली जाणार आहे.

No comments:

Post a Comment