श्री राजपुत करणी सेनेच्या नगर शहर कार्याध्यक्षपदी किसनसिंह परदेशी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

श्री राजपुत करणी सेनेच्या नगर शहर कार्याध्यक्षपदी किसनसिंह परदेशी

 श्री राजपुत करणी सेनेच्या नगर शहर कार्याध्यक्षपदी किसनसिंह परदेशी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः देशभर कार्यरत असणार्या श्री राजपूत करणी सेनेच्या नगर शहर कार्याध्यक्षपदी किसनसिंह परदेशी यांची नियुक्ती करुन तसे पत्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विरेंद्रसिंह चौहान यांनी नुकतेच दिले. किसनसिंह परदेशी हे नगरमधील विविध सामाजिक कार्यात सक्रीय असून, राजपूत समाजाचे संघटन आणि कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची राजपुत करणी सेनेच्या नगर शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून आपण समाज संघटन करुन सामाजातील प्रलंबित प्रश्न सोडविणार असल्याने श्री.किसनसिंह परदेशी यांनी सांगितले.
    या निवडीबद्दल त्यांचे जिल्हाध्यक्ष प्रितमसिंह परदेशी, उपाध्यक्ष अमोलसिंह ठाकूर आदिंसह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment