राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची अवहेलना होऊ देऊ नका ः येलुलकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 17, 2020

राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची अवहेलना होऊ देऊ नका ः येलुलकर

 राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची अवहेलना होऊ देऊ नका ः येलुलकर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा लालटाकी येथील अंधारात गडप झालेला पुतळा आज एकांतवासात आहे.लगडे अंधाराच्या साम्राज्यात जणू खितपत पडलेल्या या पुतळ्याकडे पाहून मन खिन्न झालं...
पंडितजी आपल्या शहराच्या भूईकोट किल्ल्यात 1942 ते 1945 मधे स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांच्या बंदिवासात होते...
मग आताच्या त्यांच्या या परिस्थितीला अंधार कोठडी म्हणायचं का???
राष्ट्राच्या उभारणीसाठी बलिदान, योगदान दिलेल्या महान पुरुषापुढे अशी वेळ येत असेल..
तर कुठे गेलं आपलं या शहराच्या, देशाच्या  प्रती हेच  दायित्व असेल तर हे क्लेशदायक आहे.
महापालिका प्रशासनाने त्वरीत लक्ष देऊन या पुतळ्याच्या जागी दिव्यांची व्यवस्था करावी. अथवा पुतळा बागेच्या परिसरात बसवावा. अशी मागणी माजी नगरसेवक व रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment