शैलेश मुनोत यांच्या नेतृत्वाखालील जय आनंद मंडळाचे कार्य सर्वांसाठी आदर्शवत : शिंगी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, December 17, 2020

शैलेश मुनोत यांच्या नेतृत्वाखालील जय आनंद मंडळाचे कार्य सर्वांसाठी आदर्शवत : शिंगी

 शैलेश मुनोत यांच्या नेतृत्वाखालील जय आनंद मंडळाचे कार्य सर्वांसाठी आदर्शवत : शिंगी

नूतन सेक्रेटरी हेमंत मुथा यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मागील वीस वर्षांपासून जय आनंद महावीर युवक मंडळ नगरमध्ये मोठे सामाजिक काम करीत आहे. मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी युवा शक्तीला विधायक दिशा देत कार्य चालवले आहे. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात मंडळाचे अभिमानास्पद कार्य चालू असून सर्वांना पदाची संधी देवून मंडळ प्रत्येकाला प्रोत्साहीत करीत आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामांमुळे हे मंडळ सगळ्यांसाठीच आदर्शवत बनले आहे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन किरण शिंगी यांनी केले.
नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्या अध्यक्षपदी शैलेश मुनोत यांची फेरनिवड झाली आहे तर सेक्रेटरीपदी हेमंत मुथा यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल किरण शिंगी मित्र परिवारातर्फे शिंगी यांच्या हस्ते मुथा यांचा राजस्थानी फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मंडळाच्या सर्व नूतन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चेतन कर्जतकर, योगेश चंगेडिया, स्तिमित शहा, संदीप करमाळकर आदी उपस्थित होते.
हेमंत मुथा म्हणाले की, जय आनंद मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून मंडळाचे काम करीत आहे. आता सेके्रटरीपदी मिळालेली संधी मोलाची असून या माध्यमातून आणखी चांगले काम करण्याचा प्रयत्न राहिल. या निवडीबद्दल मित्र परिवाराने केलेला सत्कार प्रेरणादायी आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here