गुरुमाऊली मंडळाच्या वतीने संजय शिंदे यांचा निवडीबद्दल सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

गुरुमाऊली मंडळाच्या वतीने संजय शिंदे यांचा निवडीबद्दल सत्कार

 गुरुमाऊली मंडळाच्या वतीने संजय शिंदे यांचा निवडीबद्दल सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः निस्वार्थ व पारदर्शक कामामुळे लोकनेतृत्व विकसीत होत असते. सर्वसामान्यांची कामे केल्यास पद आपोआप चालून येतात. संजय शिंदे यांनी शिक्षक बँक व गुरुमाऊली मंडळात निस्वार्थ भावनेने शिक्षकांची प्रतिष्ठा व पत उंचावण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षक बँक व गुरुमाऊली मंडळाला ऊर्जित अवस्थेत आणण्याचे काम केले. याच कार्याची दखल घेत त्यांना अध्यक्षपदाची धुरा न मागता मिळाली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले.
भिंगार येथील वृंदावन लॉनमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग, रोहकले प्रणित गुरुमाऊली मंडळ व विकास मंडळाच्यावतीने संजय शिंदे यांची विकास मंडळाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री कर्डिले बोलत होते. शिक्षक परिषदेचे राज्यसंपर्क प्रमुख रावसाहेब रोहकले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र जायभाय, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, नाशिक विभाग कार्यवाह बाबासाहेब पवार,राहुल पानसरे, नागरदेवळे सरपंच राम पानमळकर, नगर तालुकाध्यक्ष संजय दळवी, संजय साठे, योगेश सुर्यवंशी, मंजुश्री औटी, गुरुमाऊली मंडळाचे नगर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाबळे, सरस्वती गुंड, विक्रम नरवडे,संतोष निमसे,अविनाश निंभोरे,राजेंद्र मुंगसे,दिलीप औताडे, संतोष अकोलकर, सविता पानमळकर, अनिता शिंदे, राजाभाऊ पासवे, विकास मंडळाचे सचिव मच्छिंद्र कोल्हे, मोहनराव राशिनकर तसेच शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक विकास डावखरे यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पोटे यांनी केले. आभार बाबा पवार यांनी मानले.

No comments:

Post a Comment