पाईपलाईनचे लिकेज काढा प्रभाग 2 मधील नगरसेवकांची मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 19, 2020

पाईपलाईनचे लिकेज काढा प्रभाग 2 मधील नगरसेवकांची मागणी.

 पाईपलाईनचे लिकेज काढा प्रभाग 2 मधील नगरसेवकांची मागणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्रमांक 2 मधील वसंत टेकडी ते हॉटेल महाराजा पर्यंत असलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटलेली असून या पाईपलाईनचे लिकेज त्वरित काढण्यात यावे अशी मागणी सौ. रूपालीताई वारे यांनी उपायुक्त यांना दिले आहे.
   आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 2 मधील वसंत टेकडी  ते हॉटेल महाराजा पर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन असून सदरील पाईपलाईन शिपाई अर्बन बँक कॉलनी, विर सावरकर मार्ग, बी. टी. आर. गेटसमोर व हॉटेल महाराजा जवळ तसेच आदी ठिकाणी फुटलेली आहे त्यामुळे बरेचसे पाणी वाया जात आहे. सदरील पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटल्यामुळे सदरील पाणी नगर-औरंगाबाद महामार्गावर वाहत असून या ठिकाणी बरेचसे अपघात देखील झालेले आहेत. त्यामुळे सदरील पाईपलाईनचे लिकेज काढणे अत्यंत गरजेचे आहे.
    तरी सदरील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचे लिकेज तात्काळ काढण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, पुरवठा प्रमुख सातपुते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment