भाजपाचा सुफडा साफ करण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 19, 2020

भाजपाचा सुफडा साफ करण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय

 भाजपाचा सुफडा साफ करण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय

कर्डिलेचं तालुक्यात अस्तित्व नसल्याचा गाडेंचा टोला..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिवाजी कर्डिले आता माजी आमदार झाल्याने त्यांचे नगर तालुक्यात काहीच अस्तित्व राहिले नसल्याचा टोला नगर तालुका महाविकास आघाडीचे नेते प्रा. शशिकांत गाडे यांनी लगावला. नववर्षात नगर तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्यावतीने गावोगावच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी गाडे बोलत होते.
लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने ऐन हिवाळ्यातही गावोगावचे राजकारण चांगलेच तापले आहे. नगर तालुक्यातील महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांना एकत्रित करत कोणत्याही परिस्थितीत नगर तालुक्यातून भाजपाचा सुपडासाफ करायचाच, अशी वज्रमुठ आवळली आहे.
नगर तालुक्यातील दहा गावे बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार . खारेकजुने, टाकळी काझी या बिनविरोध होणार आहे . महाविकास आघाडीने जिल्हा परिषद पंचायत समिती एकत्रीत ल6वल्या आता ग्रामपंचायत आघाडी एकत्र लढवणार आहे. गावपातळीवर सर्व पक्षाचे कार्यकर्त एकत्र आले तर भाजप चा पराभव होईल .बुर्‍हानगर ग्रामपंचायती कडे हि लक्ष राहणार आहे आता रोहीदास कर्डिले आपल्या बरोबर आहे . प्रत्येक गावात महाविकास आघाडी पॅनल उभा करा पॅनलला नगर तालुका मह विकास आघाडी असे नाव सुरवातीला दया. ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रत्येक गावात प्रचार सभा घेणार आहे . शेतकर्‍याच्या अडचणी सोडवण्यासाठी या निवडणुका जिंकायच्या आहेत . यावेळी प्रताप शेळके -तनमनधनाने सर्वानी एकत्र या जिरवाजिरवीचे राजकारण करू नका . चांगले नेतुत्व दिले तर जिप चा निधी खाली देता येतो विरोधकांच्या हातात सत्ता देऊ नका . ग्रामपंचायत ताब्यात आल्या तर निधी कमी पडणार नाही.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धव दुसुंगे, काँग्रेसचे संपतराव म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, गोविंदराव मोकाटे, इंजि. प्रविण कोकाटे, उपसभापती रविंद्र भापकर, रोहिदास कर्डिले, किसनराव लोटके, बाबासाहेब गुंजाळ, प्रकाश कुलट आदींसह गावोगावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, हराळ, मोकाटे, भगत, दुसुंगे, निंबाळकर, कर्डिले, कोकाटे यांची भाषणे झाली.
यावेळी हराळ, मोकाटे, भगत, दुसुंगे, निंबाळकर, कर्डिले, कोकाटे यांची भाषणे झाली.

No comments:

Post a Comment