गाडगीळ पटांगण नालेगाव येथे दत्त जयंती उत्साहात साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 31, 2020

गाडगीळ पटांगण नालेगाव येथे दत्त जयंती उत्साहात साजरी

 गाडगीळ पटांगण नालेगाव येथे दत्त जयंती उत्साहात साजरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः भारतीय संस्कृती जगात महान आहे. आध्यात्म व धार्मिकतेमुळे आपली संस्कृती टिकून आहे. वैभवशाली परंपरा व संस्कृती टिकवण्यासाठी, तिचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आजच्या युवा पिढीने पुढे आले पाहीजे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाला आध्यात्मिकतेची जोड अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय मुदगल यांनी केले.
छत्रपती शिवराय तरुण मंडळ व पावन हनुमान व्यायाम शाळा यांच्यावतीने गाडगीळ पटांगण येथे श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा झाला त्यावेळी ते बोलत होते.
गुरु दत्तात्रय हे ब्रम्हा विष्णु व महेश यांचा अवतार आहेत. त्यांना असुरी शक्तींचा नाश केला.
आज तरुणांनी आध्यात्मीक व धार्मिक विचारांचा प्रचार प्रसार करणे काळाची गरज असल्याचे श्री मुदगल यावेळी म्हणाले.  उत्सवानिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.  यावेळी मंडळाचे सदस्य व भाविक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment