माहितीपर दिनदर्शिका प्रत्येकाला उपायुक्त- योगेश मालपाणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 31, 2020

माहितीपर दिनदर्शिका प्रत्येकाला उपायुक्त- योगेश मालपाणी

 माहितीपर दिनदर्शिका प्रत्येकाला उपायुक्त- योगेश मालपाणी

माहेश्वरी युवा संघटनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आपले दैनंदिन कामकाज हे दिनदर्शिकेवर अवलंबून असते. वर्षभराचे नियोजन करण्यासाठी दिनदर्शिकेचा उपयोग होत असल्याने दिनदर्शिका ही महत्वाची आहे. वर्षभरातील सण, उत्सव, राष्ट्रीय सण, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीची माहिती ही दिनदर्शिकेतून होत असते. विशेषत: महिलांचा दिवस हा दिनदर्शिका पाहूनच होत असतो. व्रत-वैकल्य आणि त्याची माहितीवरुन नियोजन ठरत असते. अशी कुटूंबातील प्रत्येक सदस्यांची गरज दिनदर्शिका असते. संस्थेने विविध सामाजिक कार्याबरोबरच दिनदर्शिकेचा उपक्रम हा प्रत्येकाला उपयुक्त असाचा आहे, असे प्रतिपादन योगेश मालपाणी यांनी केले.
माहेश्वरी युवा संघटनच्यावतीने 2021 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अतुल डागा, मनिष सोमाणी, योगेश मालपाणी, अमित काबरा, अध्यक्ष विशाल झंवर आदिंच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष शाम भुतडा, गणेश लढ्ढा, सचिव शेखर आसवा, खजिनदार अनिकेत बलदवा, सहसचिव गोविंद दरक, अमित काबरा, संघटनमंत्री पवन बिहाणी, क्रिडा मंत्री मुकुंद जाखोटीया, आयटी हेड गोविंद जाखोटिया, नियोजन समिती अमित जाखोडिया, संकेत मानधना, पवन बंग, उमेश झंवर, सिद्धार्थ झंवर, सुमित बिहाणी, सुमित चांडक, प्रतिक सारडा, कुणाल लोया, योगेश सोमाणी, पियुष झंवर,  राहुल सोनी, संकेत अट्टल आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अध्यक्ष विशाल झंवर म्हणाले, माहेश्वरी युवा संघटनेच्यावतीने  रक्तदान, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना वाटप, क्रिकेट स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच युवकांचे संघटन करुन त्यांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे. समाजातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या वर्षी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आले असून ही सर्वसमावेश दिनदर्शिका असून, विशेषत: माहेश्वरी समाजातील विविध सन, उत्सव व महत्वांच्या घटनांचा उल्लेख केलेला आहे. तसेच संघटनेच्यावतीने वर्षभर राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांची सचित्र माहिती देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment