केडगाव जागृक नागरिक मंचच्यावतीने वृक्षारोपणाने संस्थेचा स्थापना दिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

केडगाव जागृक नागरिक मंचच्यावतीने वृक्षारोपणाने संस्थेचा स्थापना दिन साजरा

 केडगाव जागृक नागरिक मंचच्यावतीने वृक्षारोपणाने संस्थेचा स्थापना दिन साजरा

हरित केडगाव मोहिमेतंर्गत माधवनगर परिसरात वृक्षारोपण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः एकच ध्यास हरित विकास हा मंत्र घेऊन केडगाव जागृकनागरिक मंचच्या वतीने हरित केडगाव ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत संस्थेचा स्थापना दिवस वृक्षरोपणाने साजरा करण्यात आला.  माधवनगर परिसरात वृक्षरोपण अभियान राबवून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी राहणार्या नागरिकांकडे सोपविण्यात आली.  
केडगाव जागृकनागरिक मंचच्या वतीने जून महिन्यापासून हरित केडगांव ही मोहीम राबविण्यात आली आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रोपे लाऊन त्याचे संवर्धन करण्यात आले. मंचातर्फे दर रविवारी प्रत्येक कॉलीनीत वैयक्तिक जबाबदारी देत वृक्षारोपण अविरत चालू ठेवण्यात आले आहे. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे. वृक्षारोपणाचे महत्व लहानग्यांपासून ज्येष्ठ व्यक्तींना देखील वृक्षरोपण व संवर्धनाचे महत्त्व पटले आहे.
संस्थेचे अध्यक्ष विशाल पाचारणे  म्हणाले  की, एकमेव निसर्ग मनुष्याची गरज पूर्ण करू शकतो. मात्र स्वत:च्या हव्यासापोटी मनुष्याने निसर्गाचे नुकसान केले आहे. निसर्ग संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असून, या भावनेने केडगाव जागृक नागरिक मंचने हरित केडगाव ही संकल्पना राबवली. लोकांच्या सहभागामुळे ही मोहीम व्यापक बनली असल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेतंर्गत माधवनगर भागात वड, पिंपळ, कडूलिंब व अशोका सारखी झाडे लावण्यात आली. येथील प्रत्येक रहिवासी नागरिकाला झाडाची वैयक्तिक संगोपनाची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी रामभाऊ पवार, मेजर सतीश ठुबे, प्रकाश पाटसकर, माधव कुलकर्णी, गणपत वाघमोडे, मेजर मंजाबापू गुंजाळ, दादाभाऊ बोरकर, नारायण गाडेकर, रमेश उरमुडे, संस्थेचे गणेश पाडळे, प्रवीण पाटसकर, अनिल मरकड, शारदाताई शिरसाठ, विशाल सकट, गणेश लोळगे, पुनम तानवडे, अंबिका कंकाळ, डॉ.सुहास साळवे आदिंसह संस्थेचे सर्व प्रतिनिधी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment