कृष्ठधाम रस्त्याचे कामात घाई नको नियोजनपूर्वक काम व्हावे! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 19, 2020

कृष्ठधाम रस्त्याचे कामात घाई नको नियोजनपूर्वक काम व्हावे!

 कृष्ठधाम रस्त्याचे कामात घाई नको नियोजनपूर्वक काम व्हावे!

नगरसेविका सोनाबाई शिंदे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सावेडी उपनगरातील तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग दरम्यानच्या कुष्ठधाम रस्त्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे. या रस्त्याचे महत्व ओळखून हा रस्ता मोठा, प्रशस्त व दर्जेदार व्हावा यासाठी आम्ही सुरुवातीपासून पाठपुरावा करीत आहोत.
आता या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु असून वीजेचे खांब, ड्रेनेजलाईन, पाण्याची पाईपलाईन, बाधा निर्माण करणारे रोहीत्र इ कामाचे कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे सदर कामात घाई नसावी,  नियोजनपुर्वक काम व्हावे तो पर्यंत हे काम बंद करावे अशी आक्रमक भूमिका नगरसेविका सोनाबाई शिंदे व तायगा शिंदे यांनी घेतली आहे. याबाबतचे निवेदन मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार व संबंधीत ठेकेदार यांना देण्यात आले आहे.
साडेतीन कोटी रुपये खर्चाच्या  कुष्ठधाम रस्त्यामुळे उपनगराच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे हा रस्ता नियोजनपूर्वक व दर्जेदार होणे आवश्यक आहे. अडथळा ठरणारे वीजे खांब, रोहित्र इ तातडीने हटविण्यात यावेत. ड्रेनेज व पाईपलाईनची कामे नियोजन पूर्वक करण्यात यावी, की जेणे करुन हा रस्ता भविष्यात वारंवार खोदण्याची आवश्यकता पडणार नाही. अन्यथा कोट्यावधी रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. त्या तसेच या रस्त्यावर फुलझाडे, वृक्ष लावून सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी सोनाबाई शिंदे व तायगा शिंदे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment