महाविकास आघाडीमुळे बदलणार ग्रामपंचायत निवडणुकींचे राजकीय समीकरणे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 26, 2020

महाविकास आघाडीमुळे बदलणार ग्रामपंचायत निवडणुकींचे राजकीय समीकरणे.

 महाविकास आघाडीमुळे बदलणार ग्रामपंचायत निवडणुकींचे राजकीय समीकरणे.


माका - 
राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर झाले असता,राज्यसरकारकडुन निवडणुकांसंदर्भात सरपंच आरक्षणाबाबत,तसेच सातवी पास अटीबाबत ऐनवेळीच्या निर्णायक बदलावाने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.राज्यात काँग्रेस,रा.काँग्रेस,शिवसेनेने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.याअगोदर हे पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात असल्याने आजरोजी एकत्र आल्याने,आजरोजी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायती निवडणुकांसाठी पॅनल उभे करण्याबाबत अडचणी येत असल्याची चर्चा तसेच राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह दिसून येत असल्याचे पहावयास मिळत आहे.  

राज्यातील बदलावाप्रमाणे स्थानिक पातळीवर सुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या पॅनल(पार्ट्या)मध्ये याअगोदर पारंपारिक एकमेकांत असलेले राजकीय हाडवैर बाजुला ठेवून एकमेकांसमोर उभे न रहाता,एकत्रित निवडणूका लढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.याअगोदर गावपातळीवरील गटतटात या तिन्ही परस्परविरोधी पक्षाचे नेते,कार्यकर्ते आपापल्या परीने संघटन करून आपणाकडे विजयश्री खेचण्यासाठी धडपड करत असे.निवडणुकीत मतदानासाठी,इतर खर्चासाठी,प्रचार मोहिमेत लागेल ती रसद पक्षांकडुन किंवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून पक्षाच्या नावे पॅनल उभे करुन राजकीय स्वरुपाचे वजन वाढविण्यात दंग असल्याचे पहावयास मिळत असे.                                                    राज्य सरकारने ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसंदर्भात कार्यक्रम जाहीर करताच,ग्राम पंचायती निवडणुकीसाठी निवडणुका मतदानानंतर सरपंच आरक्षणनिश्चिती निर्णय,तसेच उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असतांनाच ऐनवेळी उमेदवारांसाठी सातवी पास अटीबाबतचा निर्णय,यामुळे पॅनल उभे करणारयां प्रमुखांसमोर,तसेच उमेदवारांसमोर उमेदवार निश्चीत  करण्याबाबत,तसेच सरपंच आरक्षण निश्चिती बाबतीत संभ्रम निर्माण झाला असून,पॅनलसाठी निवडणूकखर्च करण्यासाठी पुढाकार न घेता गोंधळून गेल्याची चर्चा पारावरती,चौकात,चहादुकानात मतदारांत चालू असल्याचे पहावयास मिळत आहे.या सर्व बाबी विचारात घेता,महाविकास आघाडी सरकारमुळे राज्यातच नव्हे तर,स्थानिक पातळीवर सुद्धा ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये पक्षाच्या पॅनल प्रमुख,उमेदवार,मतदार यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असुन,ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबतीत राजकीय समीकरणं चुकली हुकल्याची चिन्हं दिसून येत,बदल घडवून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

No comments:

Post a Comment