अखंड आरोग्य सेवेच्या परंपरेला पन्नासवर्ष झाली असून पुढे ही कोव्हिड रुग्णांना मोफत सेवा प्रदान केली जाणार! - रवी आरोळे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 26, 2020

अखंड आरोग्य सेवेच्या परंपरेला पन्नासवर्ष झाली असून पुढे ही कोव्हिड रुग्णांना मोफत सेवा प्रदान केली जाणार! - रवी आरोळे.

 अखंड आरोग्य सेवेच्या परंपरेला पन्नासवर्ष झाली असून पुढे ही कोव्हिड रुग्णांना मोफत सेवा प्रदान केली जाणार! -  रवी  आरोळे.


जामखेड - 
तालुक्यातील कोरोना रूग्णांचे मोफत सेवा प्रदान करत असलेले आरोळे कोव्हिड सेंटर कोव्हिड रूग्णांचे मोठे आशा निर्माण झाले असून जिल्ह्यात खुप प्रसिद्ध झाले आहे. कोव्हिड महामारीमुळे दिड हजाराच्या वर कुटुंब यात ग्रासलेली असताना नाताळसण आनंदात साजरा करणे मला पचले नाही, म्हणूनच या वर्षी आरोळे हाॅस्पिटल मध्ये धुमधडाक्यात नाताळसण साजरा न करता आलेल्या कोव्हिड रूग्णांच्या सानिध्यात नाताळ साजरा करण्यातच आम्हाला आनंद वाटत आहे. असे आरोळे कोव्हिड सेंटरचे संचालक रवी दादा आरोळे यांनी म्हटले आहे. 

दि 25 डिसेंबर ख्रिश्चन बांधवांचा आनंदाचा सण नाताळ! ख्रिस्ती धर्माचे संस्थापक प्रभू येशु ख्रिस्ताचा जन्म दिवस जगभर आनंदाने साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताच्या जन्म दिवसा पासून इसवीसन वर्षे मोजली जात आहेत. अशा जगाचे तारणहार करणार्‍या महान राजाचे या पृथ्वीवर आगमण झाले तो हा दिवस. तेव्हां पासून नाताळ म्हणजे आनंद, असा हा परंपरेनुसार पाळत आलेला सणाला जामखेड शहरात मोठे आकर्षण असते. पण या वर्षी कोणताही समारंभ न करता चर्च न भरवता, केवळ स्नेहाने गाठी भेटी घेत आॅनलाईनवर येशू प्रभुचा संदेश रेव्ह डॉ शोभाताई आरोळे यांनी आपल्या ख्रिश्चन बन्धूंना दिला. 

नाताळ सणानिमित्त आरोळे कोव्हिड सेंटरला भेट दिली असता संचालक रवी दादा आरोळे यांनी सांगितले की, पद्मभूषण डॉ रजनीकांत आरोळे व डॉ मेबल आरोळे या दांपत्यांनी दि 27 सप्टेंबर 1970 साली येथे या प्रकल्पाव्दारे आरोग्य सेवेचे   छोटेखानी एक रोपटे लावले होते. आज पन्नास वर्षात त्याचा मोठ विस्तार होवून विशाल स्वरुप झाले आहे. ते माझे जन्मदाते होते याचा मला खूप गर्व आहे. त्याच्या येशू ख्रिस्ताच्या विचाराने आम्ही दोधे बहीण भाऊ ही सेवेची धूरा वहात आहोत. अनंत अडचणी आहेत. पण आईवडीलांच्या विचारानेच आम्ही घडल्याने आज पर्यत आरोग्य सेवा गरीब दुबळ्यांना प्रदान करत आहोत. येशू ख्रिस्ताने आपल्या शिकवणीत काय सांगितले आहे की, तुझा शेजारी भुकेला आहे, तर खावयास दे, तहानलेल्या आहे, तर पिण्यासाठी पाणी दे, उघडा नागडा आहे तर पांघरवयास कपडे दे. या दिन गरीबांतील तुम्ही एकाला जरी तुम्ही मदत केली, ती मलाच केली आहे असे समजा. एकमेकांचे दुःख वाटून घ्या. आदी येशु ख्रिस्ताच्या मार्गावर आईवडीलांनी आपले आयुष्य घालवले त्याच प्रमाणे आम्ही ही सेवेचे व्रत घेऊन जात आहोत. यावेळी मी आवर्जून दानशुर दात्यांचे आभार मानतो, त्यांनी या अडचणीत कोव्हिड सेंटरला मोठ्या दिलदारपणे खुप मोठी मदत केली आहे. मी सर्वांचे या दातृत्वा बद्दल आभार मानतो आहे. प्रभुने सर्व जगावर आपली कृपा दृष्टी ठेवून मानवांना साहाय्य करावे अशी या नाताळ सणा निमित्ताने प्रार्थना करीत आहे असे म्हणाले. कोव्हिड अजून ही जगातून संपलेला नसून, प्रत्येक नागरीकांनी साबणाने हात धूणे, तोंडाला मास्क बांधने आणि सोशल डिस्टिंक्शनचा वापर करणे हे त्रीसुत्रीय शासनाचे आदेश पाळावेत असे नम्र आवाहन केले आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे, अविनाश बोधले, ओंकार दळवी, पप्पुभाई सय्यद, लियाकत शेख, समीर शेख, अनिल धोत्रे आदि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा जामखेड पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment