1 हजाराची लाच..2 पोलीस एसीबींच्या जाळ्यात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

1 हजाराची लाच..2 पोलीस एसीबींच्या जाळ्यात

 1 हजाराची लाच..2 पोलीस एसीबींच्या जाळ्यात

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील तक्रारदाराच्या वाळू वाहतूक करणार्‍या ट्रक विनाकारवाई सहीसलामत शहरातून पास होण्यासाठी एक हजारांची लाच स्वीकारताना दोन पोलिस कर्मचारी ’एसीबी’च्या जाळ्यात अडकले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगरमधील पथकाने नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे ही कारवाई केली. संतोष बाळु पागी,  (वय 35, पोलीस नाईक  ब न. 1976.वर्ग 3रा- हल्ली मु- श्री आंधळे यांचे घरात भाड्याने, माधवनगर, लासलगाव रोड मनमाड.मुळ रा- बापन विहीर, ता- त्र्यंबकेश्वर जि नाशिक.) व दिलीप बाजीराव निकम, (वय 51, पोलीस हवालदार ब नं 2432, वर्ग 3रा- मु पो साकुरा, ता. नांदगाव जि नाशिक) दोघे नेमणूक  - मनमाड शहर पोलीस ठाणे. ता- मनमाड,  जि नाशिक , अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या वाळुच्या तीन ट्रक अधिकृतपणे गुजरात ते शिर्डी अशी वाळु वाहतूक करतात. सदरच्या ट्रक मनमाड शहर पोलीस ठाणे हद्दीतुन पास होताना त्यांची अडवणूक करुन काही कायदेशीर कारवाई न करणे करिता वर नमूद दोन्ही आरोपी लोकसेवक यांनी तक्ररदार यांचे कडे पंचासमक्ष 1 हजार रुपयांची मागणी करुन ती लाचेची रक्कम आज रोजी मनमाड शहरातील मनमाड चौफुली येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष  स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले .सापळा अधिकारी शाम पवरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

No comments:

Post a Comment