सामान्य कार्यकर्त्यांच्या मुलीच्या लग्नाला केंद्रीय मंत्र्यांची हजेरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

सामान्य कार्यकर्त्यांच्या मुलीच्या लग्नाला केंद्रीय मंत्र्यांची हजेरी

 सामान्य कार्यकर्त्यांच्या मुलीच्या लग्नाला केंद्रीय मंत्र्यांची हजेरी


कोपरगाव :-
मा. केंदीय सामाजिक व न्याय राज्य मंत्री रामदासजी आठवले साहेब हे नेहेमीच आपल्या विविध शैली साठी प्रसिद्ध असतात. 
तसेच ते आपल्या सामन्यातील सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी नेहेमीच खंबीरपणे उभे राहतात.
२८डिसें. रोजी कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील विजयजी शिंगाडे या कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नाला वेळात वेळ काडून केंद्रीय मंत्री आद.रामदासजी आठवले साहेब यांनी हजेरी लावून नवविवाहित दांपत्यास आशीर्वाद दिला. या वेळी मा.आमदार स्नेहलतताताई कोल्हे,  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राज्य सचिव दिपकराव गायकवाड, संपर्क प्रमुख श्रीकांतजी भालेराव, राष्ट्रीय दलित पँथर चे अध्यक्ष नानासाहेब भालेराव, वंचित बहुजन आघाडी चे शरद खरात, रिपब्लिकन विध्यार्थी सेनेचे कुणाल झाल्टे, भारतीय बौद्ध महासभेचे नानासाहेब जगताप, पत्रकार रवींद्र जगताप,अजय विघे प्रकाश दुशिंग तसेच राज्यातील तथा जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, राष्ट्रीय दलित पँथर, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गोरखनगर येसगाव अशा राज्यातील तथा नगर जिल्ह्यातील विविध आंबेडकर चळवळीतील संघटनेचे कार्यकर्ते सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते.
     सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहणारे मा.मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीने सादर विवाहाची चर्चा कोपरगाव तालुक्यात तसेच येसगाव पंचक्रोशीत आश्चर्याचा तसेच चर्चेचा विषय ठरली आहे.

No comments:

Post a Comment