विविध मागण्यांसाठी मांडे यांचे ठिय्या आंदोलन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

विविध मागण्यांसाठी मांडे यांचे ठिय्या आंदोलन.

 विविध मागण्यांसाठी मांडे यांचे ठिय्या आंदोलन.

मढेवडगाव सेवा संस्थेत राजकीय द्वेषापोटी सभासद शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ

श्रीगोंदा  : मढेवडगांव ता. श्रीगोंदा येथील मढेवडगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या २१० सभासद शेतकऱ्यांना खावटी कर्ज व पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करून सत्ताधारी संचालक मंडळ मागील काही दिवसांपासून राजकीय द्वेषापोटी हा प्रकार करून सभासदांवर अन्याय करत असल्याचा आरोप करून रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांनी सहाय्यक निबंधक सहकार विभाग यांच्या कार्यालयात अचानक सोमवार दि.२८ रोजी ठिय्या आंदोलन केले. दूरध्वनीवरून जिल्हा सहकार निबंधक दिग्विजय आहेर यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्याने मांडे यांनी आंदोलन मागे घेतले.
        या संस्थेची स्थापना १९३० साली झाली असून,एकूण सभासद संख्या १५४८ आहे संस्थेचा नोंदणी क्र. ६८१२ आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून लेखी आश्वासन मिळून देखील संस्थेने जाणूनबुजून राजकीय आकस धरत काही सभासदांना कर्जप्रकरणापासून वंचित ठेवल्याने मढेवडगांव येथील कर्ज न मिळालेल्या सभासदांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात अचानक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे व अन्य सभासद शेतकरी सहभागी झाले होते. मढेवडगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा संस्थेच्या २१९ सभासद शेतकऱ्यांनी संस्थेच्या उपविधी प्रमाणे व
सहकारी बँकेच्या धोरणानुसार कर्ज मिळण्यासाठी सर्व कागदपत्रे दिली. वेळोवेळी कर्जाची मागणी केली होती. मात्र संस्थेने अनेक दिवस लोटून देखील राजकीय सुडापोटी कर्ज प्रकरणे मंजूर केलेली नाहीत. संचालकांच्या जवळचे सगेसोयरे, पाहुणे मंडळी या सभासदांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. वरिष्ठ कार्यालय व जिल्हा बँकेचा कसलाही  आदेश नसताना सचिव व संचालक मंडळाच्या संगनमताने  मनमानी कारभार चालू आहे. संस्थेने अंतिम मंजूरी दिली नसल्याने वंचित सभासदांच्या खात्यात अद्यापी कर्जाची रक्कम जमा झालेली नाही.
संस्थेने वेळकाढूपणा करुन काही सभासद शेतकऱ्यांना लक्ष करण्याचे काम केले आहे. संस्थेच्या पदाधिकारी व सचिवांनी कर्ज देण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे २१० सभासद कर्जापासून वंचित राहिलेले आहे.असा आरोप मांडे यांनी केला आहे.
        कर्ज मिळण्याची मुदत संपत आलेली असून याप्रकरणी न्याय मिळण्यासाठी यापुर्वी सभासदांनी सहाय्यक निबंधक श्रीगोंदा यांना निवेदन दिले होते. सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून संस्थेचे सचिव व संचालक मंडळ यांना पत्राद्वारे कळवून सदर प्रकरणे मार्गी लावण्याचे व शेतकऱ्यांचे प्रलंबित कृषी कर्ज वाटप सुरळीत करण्याचे पत्र पाठविले होते. तरी  सभासद शेतकऱ्यांना अद्यापि कर्ज मिळाले नसल्याने रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब मांडे, अंबादास मांडे, राजेंद्र शिंदे, संदीप मांडे यांच्यावतीने सहाय्यक निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

No comments:

Post a Comment