नगरपरिषदे कडुन जामखेड च्या बाजार तळ भागातील टपरी धारकांन वर कारवाई सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

नगरपरिषदे कडुन जामखेड च्या बाजार तळ भागातील टपरी धारकांन वर कारवाई सुरू

 नगरपरिषदे कडुन जामखेड च्या बाजार तळ भागातील टपरी धारकांन वर कारवाई सुरू 

अतिक्रम जर काढयाचे असतील तर सर्व अतिक्रमण काढावे असे नागरिकांन कडुन मागणी... 


जामखेड - 
बाजारतळावर देण्याघेण्याच्या तक्रारीवरून वादग्रस्त ठरलेल्या टपरयासह बाजारतळावरील 25 अनाधिकृत टपऱ्या काढण्याचे काम नगरपरिषद प्रशासनाकडून सुरू झाले आहे. मात्र या मध्ये दुजाभाव न करता सरसकट टपऱ्या काढाव्यात अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे. तसेच या नवीन टपऱ्या पडल्याच कशा व काही अधिकृत झाल्या कशा याची चौकशी होणार का? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.

जामखेड नगरपरिषदेच्या हद्दीतील भाजी बाजारतळाच्या आजुबाजुला अनेक ठिकाणी अनाधिकृत टपऱ्या टाकल्या आहेत. या मध्ये अनाधिकृत टपऱ्या या संबंधीत कर्मचारी व आधिकाऱ्यांना हाताशी धरून व नगरपरिषदेचा बेकायदेशीर ठराव करून अधिकृत टपऱ्या केल्या आहेत. असा आरोप ज्यांच्या टपऱ्या काढल्या आहेत त्यांनी व नागरिकांनी केला आहे. त्यामुळे सरसकट टपऱ्या काढाव्यात अशी मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहेत.

आज दि 29 डिसेंबर रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या पोलीस बंदोबस्तात 25 अनाधिकृत टपऱ्या काढण्याचे काम सुरू केले. यातील 12 ते 13 तेरा टपऱ्या अतिक्रमण धारकांनी स्वतः हुन काढल्या आहेत. मात्र या मध्ये काही न्यायप्रविष्ट असल्याने त्यांची सखोल चौकशी करून त्या देखील काढण्यात येतील असे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच 2019 नंतर ज्यांचे ठराव घेण्यात आले आहेत त्यांची देखील व्यवस्थित कागदपत्रे अद्याप तरी नगरपरिषदेस सापडली नाहीत त्यामुळे अधिकृत व अनाधिकृत टपऱ्यांचा घोळ काही लवकर मिटला नाही. या बाबत सर्व कागदपत्रे पडताळून जेवढ्या टपऱ्या अनाधिकृत आसतील त्यावर देखील हातोडा पाडण्यात येईल तसेच पुढील चार ते पाच दिवस अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू राहील अशी माहीती मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

नगरपरिषद हद्दीतील अनेक टपऱ्या संबंधित कर्मचारी, अधिकारी व नगरसेवकांनी संगनमत करुन चुकीचे ठराव मंजूर केले असल्याचे समजते. या बाबत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे पाहिजे तसे पुरावे नसल्याने अधिकार्‍यांनाही समाधान कारक उत्तरे देता आली नाही. तसेच फाईल सापडत नाही तसेच या वेळी तो चार्ज माझ्याकडे नव्हता दुसर्‍या कडे होता अशी देखील उडवा उडवीची उत्तरे पत्रकार व मुख्याधिकारी यांच्या चर्चा दरम्यान कर्मचार्‍यांकडुन मिळाली.
मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पो. सा. ई. महेश जानकर, पोकाॅ राहूल हिंगसे, पोकाॅ बापू गव्हाणे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment