इंग्लडहून आलेल्यांच्या संपर्कातील लोकांना भोंग्याद्वारे तपासणीचे आवाहन करावे ः डॉ. अशरफी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 26, 2020

इंग्लडहून आलेल्यांच्या संपर्कातील लोकांना भोंग्याद्वारे तपासणीचे आवाहन करावे ः डॉ. अशरफी

 इंग्लडहून आलेल्यांच्या संपर्कातील लोकांना भोंग्याद्वारे तपासणीचे आवाहन करावे  ः डॉ. अशरफी

एमआयएमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
अहमदनगर शहरात इंग्लंड येथून आलेल्या नागरिक व त्यांचे संपर्कात आलेले अहमदनगर येथील जनतेला शोधण्यासाठी अहमदनगर शहरात फिरत असलेली घंटा गाडीचा व भोंग्याचा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात गाडी फिरवण्यात याव्यात अशी मागणी एम.आय.एम. जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  सद्या अहमदनगर शहरात पहिल्या तुलनेत कोरोना रुग्ण कमी आढळत असले तरी. कोरोना चे नवीन विषाणू काही देशात आले असल्याचे आणि त्या देशात परत लॉकडाऊन केले असल्याचे प्रसार माध्यमातून समजते. त्याच बरोबर इंग्लंड या देशातही कोरोनापेक्षा भयंकर विषाणू आल्याचे समजते. काही दिवसापूर्वी भारतात काही नागरिक विदेशातून भारतात आले असून त्यात इंग्लंड येथून ही नागरिक आले आहे. त्यातील 11 नागरिक इंग्लंड येथून आपल्या अहमदनगर शहरात आले आहे.
ज्या प्रमाणे कोरोना काळात अहमदनगर महानगरपालिकेने घंटा गाडीचा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात तब्लीग जमात आणि त्यांच्या संपर्कात आलेले नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आव्हान केले होते. तसे ना केल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केले गेले. त्याच पद्धत्तीने आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने आपण राज्यात जिल्हाधिकारी व  महानगरपालिका आयुक्त यांनी शहरात अहमदनगर शहरात फिरत असलेल्या कचरा गाडीचा म्हणजेच घंटागाडी चे स्पिकरचा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात त्या गाडी फिरवाव्या आणि जनतेला आव्हान करावे की, जे इंग्लंड येथून आलेले नागरिकांच्या संपर्कात आले त्यांनी स्वत:हून कोरोना चाचणी करावी अन्यथा त्यांचेवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येईल.
आपण असा आदेश काढला तर अहमदनगर मधील जे कोरोना रुग्ण कमी झाले आहे, ते पुन्हा वाढणार नाही अशी खातरी आम्ही अहमदनगरचे नागरिकांना होईल.  त्याचा बरोबर आपण येथील अधिकारी व  प्रसार माध्यमांचेही उपयोग करावे, असे आदेश द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment