59 ग्रामपंचायतींसाठी येथे होणार निवडणूक प्रक्रिया - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

59 ग्रामपंचायतींसाठी येथे होणार निवडणूक प्रक्रिया

 59 ग्रामपंचायतींसाठी येथे होणार निवडणूक प्रक्रिया

 1लाख 21 हजार 276 मतदारांसाठी 239 मतदान केंद्रे



नगरी दवंडी

अहमदनगर - राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अहमदनगर तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींसाठी नगर येथील तहसील कार्यालयातील मध्यवर्ती इमारतीत निवडणूक प्रक्रिया होणार आहे.

तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 216  प्रभागातून 583 सदस्य निवडून द्यावयाचे असून यासाठी दि. 14 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 63 हजार 898 पुरुष तर 57 हजार 376 महिला व इतर दोन असे एकूण 1लाख 21 हजार 276 मतदारांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. यासाठी अंदाजे 239 मतदान केंद्रे असणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे आवश्यक असून मागास प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रसोबत जातपाडताळणी पोहोच व हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी ही निवडणूक प्रक्रिया जिल्हा सैनिक लॉन्स येथे घेण्यात येणार होती परंतु काही अपरिहार्य कारणास्तव सावेडी येथील तहसील कार्यालयात ही निवडूक प्रक्रिया पार पडणार आहे.

यामध्ये दि.23 ते 30 डिसेंबर (सार्वजनिक सुट्या वगळून ) या कालावधीत नामनिर्देशन दाखल करता येणार असून दि. 31डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. दि. 4 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत  उमेदवारी अर्ज माघे घेण्याची मुदत आहे. यानंतर निवडणूक निर्णय अधीकारी हे अंतिम उमेदवारांना चिन्ह वाटप करणार आहेत. दि.15 जानेवारी रोजी सकाळी  7.30 ते सायं. 5.30 पर्यंत मतदान घेण्यात येणार असून दि. 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

उमेदवारांना मदतीसाठी  दोन हेल्पडेस्क -  

नगर तालुक्यातील  ग्रामपंचायतिच्या   निवडणूकिसाठी निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार हे आयोगाने प्राधिकृत केलेले असून त्यांच्या मदतीला  एकूण 30 निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त तर  8 राखीव आहेत. नामनिर्देशन प्रक्रिया सुलभ होणेसाठी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन व मदत करणेसाठी तहसील कार्यालयात दोन हेल्पडेस्क उघडण्यात आले आहे. तसेच आचारसंहिता कक्ष सुरू झाला असून त्याचे प्रमुख गटविकास अधिकारी हे  आहेत.

No comments:

Post a Comment