स्वस्तात सोने प्रकरणातील दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

स्वस्तात सोने प्रकरणातील दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

 स्वस्तात सोने प्रकरणातील दोन अट्टल गुन्हेगार जेरबंदनगरी दवंडी

श्रीगोंदा प्रतिनिधी : 

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून अनेकांना लुटणारा फरार आरोपी दरोडेखोर जावेद घड्याळ्या चव्हाण वय ३५ , रा सुरेगाव याला तसेच वांगदरी येथील बाबूश्या चिंगळ्या काळे वय १९ याला श्रीगोंदा पोलिसांनी छापा टाकून अटक करत एक चोरीची दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. 

           श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे आरोपी जावेद चव्हाण व त्याच्या साथीदारांनी २० ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील महिला व पुरुषांना विसापूर फाटा येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून बोलावून घेतले होते तेथे त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील ३ लाख १५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेत फरार झाला होता. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होता. विसापूर फाट्यावर दरोड्या दरम्यान जावेदच्या चार साथीदारांचा खून झाला होता. तेव्हापासून जावेद पसार झाला होता . पोलिस त्याचा शोध घेत होते . दि .१९ डिसेंबर रोजी श्रीगोंदा पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना जावेद हा सुरेगाव परिसरात आला असल्याची गुप्त माहिती मिळाली . त्यानुसार पो.नि.ढिकले यांनी सहाय्यक निरीक्षक दिलीप तेजनकर यांना सूचना करत सुरेगाव येथे कोंबिंग ऑपरेशन राबविले. तेथे पथकाने जावेद घड्याळ्या चव्हाण व बबूश्या चिंगळ्या काळे या दोघांना ताब्यात घेतले . त्यांच्याकडून एक चोरीची दुचाकी हस्तगत केली.दुचाकी त्यांनी पुणे जिल्ह्यातील यवत येथून चोरल्याचे पोलिसांना सांगितले . हे दोन्ही आरोपी अट्टल दरोडेखोर असून यांच्या विरोधात श्रीगोंदे , पारनेर , सुपे , नारायणगाव , लोणी काळभोर ,यापोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलिस हवालदार अंकुश ढवळे , पो. काँ. प्रकाश मांडगे , संजय काळे , गोकुळ इंगवले , दादा टाके , किरण बोराडे , लता पुराणे यांनी कारवाई केली.

No comments:

Post a Comment