सख्खा भाऊच निघाला पक्का वैरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

सख्खा भाऊच निघाला पक्का वैरी

 सख्खा भाऊच निघाला पक्का वैरी .

जमिनीच्या वादातून भानसहिवरेत एकाचा खून.नगरी दवंडी

वार्ताहर: नेवासा  

नेवासा -तालुक्‍यातील भानसहिवरा येथील सध्या नगर येथे रहिवासी असलेल्या चौघा भावांमध्ये जमिनीवरून वाद झाल्याने त्यातून एकाचा खून केल्याची घटना काल दुपारी घडली. नईम अब्दुल लतीफ देशमुख (वय ५५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या तिघा भावांना ताब्यात घेतले आहे.याबाबत मिळालेल्या प्राथमिकमाहितीनुसार मयत नईम व त्याचा मोठा भाऊ नदीम अब्दूललतीफ देशमुख व लहान भाऊ मोईन अब्दूललतीफ देशमुख,

रफिक अब्दूललतीफ देशमुख यांच्यामध्ये नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील जमिनीवरून वाद सुरू होते हे चौघे भाऊ नगर येथे राहत आहेत. रविवार दि.२० डिसेंबर रोजी हे चौघे भाऊ नगरहून भानसहिवरा येथे जमीन वाटप करून भांडण मिटविण्यासाठी आले होते.

जमीन वाटपावरून त्यांच्याबाचाबाची झाली. बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले भानसहिवंरा येथील ऐतिहासिक गढीच्या पायथ्याशी असलेल्या

एका टपरीजवळ नईमला तीक्ष्ण हत्याराचे वार करून मारहाण केल्याचे समजते. त्याला जखमी अवस्थेत नगर येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाल्याचे समजते. मृतदेह नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिनव त्यागी उपनिरीक्षक भरत दाते यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी नईमचे सख्खे भाऊ नदीम अब्दुललतीफ देशमुख ,मोईन अब्दूललतीफ देशमुख, रफिक अब्दुललतीफ देशमुख या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

No comments:

Post a Comment