महिला पोलिसाचा गळा दाबला. 5 जणांवर गुन्हा दाखल... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

महिला पोलिसाचा गळा दाबला. 5 जणांवर गुन्हा दाखल...

 महिला पोलिसाचा गळा दाबला. 5 जणांवर गुन्हा दाखल...

सुपा पोलिस स्टेशन मध्ये मारामारी..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सुपा येथील पोलिस स्टेशनमध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन गुन्हा नोंद करण्यासाठी विलंब होत असल्याच्या कारणावरुन पोलिस महिला कर्मचारी भिमाबाई रेपाळे यांचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आला. याप्रकरणी सोमवारी सकाळी सुपा पोलिस स्टेशनमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी पोलिस कर्मचारी भिमाबाई रेपाळे या सुपा पोलिस स्टेशनला रात्रपाळी ड्यूटीवर असताना सुपा येथील बन्सी रामचंद्र कांबळे (राहणार- इंदिरानगर मराठी शाळेजवळ सुपा. ता. पारनेर) हे त्यांची मुलगी शिवानी बन्सी कांबळे, तेजश्री बन्सी कांबळे तसेच मंदा संपत गांगुर्डे (राहणार- सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर, मुंबई) तसेच अशोक पिराजी जाधव (राहणार- सुपा, ता. पारनेर) हे रात्री 11.30 वाजता फिर्याद देण्यासाठी आले. त्यांची फिर्याद घेतण्याचे काम चालू असताना अचानक ऑनलाईन सर्व्हर डाऊन झाले, त्यामुळे फिर्याद घेण्यास विलंब होत होता. त्यावेळी पाचही आरोपींनी आमची फिर्याद घेण्यास टाळाटाळ का करतात असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
कर्मचारी रेपाळे या शिवानी बन्सी कांबळे, तेजश्री बन्सी कांबळे व त्यांची पाहुनी मंदा संपत गांगुर्डे यांना समजावून सांगत असताना त्याचा राग येऊन त्यांनी वाईट शब्द बोलून शिवीगाळ करत तुझ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तुझी नोकरी घालवते असे म्हणत अंगाला झटून शिवानी बन्सी कांबळे हिने दोन्ही हाताने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तेजश्री बन्सी कांबळे व मंदा संपद गांगुर्डे या दोघांनी मारहाण करून जखमी केले तसेच बन्सी रामचंद्र कांबळे व अशोक पिराजी जाधव यांनी त्यांना साहाय्य करत सरकारी कामात अडथळा आणला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून या पाच आरोपींविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कसे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment