भानसहिवरा खून प्रकरणातील आरोपींना 3 दिवसांची पोलिस कोठडी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

भानसहिवरा खून प्रकरणातील आरोपींना 3 दिवसांची पोलिस कोठडी

 भानसहिवरा खून प्रकरणातील आरोपींना 3 दिवसांची पोलिस कोठडी.

 


नगरी दवंडी

नेवासा  -

चौघा सख्ख्या भावांमध्ये जमिनीच्या झालेल्या वादातून एकाच्या तीक्ष्ण हत्याराने झालेल्या खूनप्रकरणी  मयत नईम अब्दुल लतिफ देशमुख यांचे   मुलाच्या फिर्यादीवरून अन्य तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   या तिघांना रविवारीच अटक करण्यात येऊन काल सोमवारी नेवासा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी तिघांनाही देण्यात अाली.

नदीम अब्दुल लतीफ देशमुख,मोईन अब्दुल लतीफ देशमुख,रफिक अब्दुल लतीफ   देशमुख अशी आरोपींची नावे आहेत.

No comments:

Post a Comment