3 हजाराची लाच स्वीकारताना महिला लघुलेखक रंगेहाथ पकडले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

3 हजाराची लाच स्वीकारताना महिला लघुलेखक रंगेहाथ पकडले.

 3 हजाराची लाच स्वीकारताना महिला लघुलेखक रंगेहाथ पकडले.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा पारनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लघुलेखक शैला राजेंद्र झांबरे यांना जमिनीचे संदर्भात चुकीचा फेरफार रद्द करणेबाबत 3 हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगर लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयात दि.18 डिसेंबर रोजी रंगेहाथ पकडले.
या बाबत सविस्तर असे की उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा- पारनेर यांच्या कडे जमिनीच्या संधर्भात चुकीचा फेरफार रद्द करणेबाबत सुरु असलेल्या दाव्याचे निकालपत्राच्या आदेशाची प्रत देण्या करिता लघुलेखक शैला राजेंद्र झांबरे यांनी तक्रारदार यांच्याकडे दि.16 डिसेंबर रोजी 10 हजारची मागणी करत अडव्हांस म्हणून 4 हजार रुपये लगेच स्विकारुन उर्वरित 6 हजार रुपये दिल्यावर आदेशाची प्रत देईल असे सांगितले. त्यावर तक्ररदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली त्या नुसार दि. 17 डिसेंबर रोजी लाचलुचपत विभागाने श्रीगोंदा तहसील कार्यालयात सापळा रचला तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये झांबरे यांनी पंचासमक्ष 5 हजार रुपयांची मागणी करत तडजोड अंती 3 हजारची मागणी केली व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाई दरम्यान ती रक्कम पंचासमक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले आहे. सदरची करवाई हरीष खेडकर, पोलीस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक श्याम पवरे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांनी केली.

No comments:

Post a Comment