बैलगाडी शर्यती भरवणाऱ्या 14 जणांविरोधात गुन्हे दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 15, 2020

बैलगाडी शर्यती भरवणाऱ्या 14 जणांविरोधात गुन्हे दाखल

 बैलगाडी शर्यती भरवणाऱ्या 14 जणांविरोधात गुन्हे दाखल.

आरोपी अटक पारनेर पोलिसांची कारवाई.नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी- पारनेर  तालुक्यातील काटाळवेढा येथे सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानाही बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते याप्रकरणी  14 जणांविरुद्ध पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तालुक्यातील बैलगाडी शर्यतीवर ही मोठी कारवाई पारनेर पोलिसांनी केली आहे

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या आदेशानुसार बैलगाडी शर्यतीला बंदी असतानाही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून बैलाच्या शर्ती लावून जनावरांना क्रूरतेने वागणूक दिली यामुळे सुभाष रामदास गाजरे  बाबाजी रामदास गाजरे  युवराज रामदास गाजरे  विलास पांडुरंग भाईक  संभाजी सुखदेव भाईक सोमनाथ पांडुरंग भाईक  धर्मनाथ रघुनाथ भाईक  बाळू बबन गुंड  खंडू कचरू भाईक  विजू दादाभाऊ गाजरे प्रकाश किसन घटाटे सर्व राहणार काताळवेढा तालुका पारनेर ज्ञानदेव जनाजी साबळे  विशाल धनाजी साबळे दोन्ही राहणार नळवणे तालुका जुन्नर जिल्हा पुणे सुरेश भीमा काकडे राहणार पळसपुर तालुका पारनेर या 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे या आरोपींनी कातळवेढा गावच्या शिवारा पासून एक किलोमीटर अंतरावर माळरानाचे चढावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते याप्रकरणी तक्रार पोलिसांकडे आल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ पथकासह घटनास्थळी पोहोचले त्यावेळी शर्यत सुरू असल्याने त्या थांबवल्या तसेच  14 जणांना ताब्यात घेण्यात आले याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस नाईक शामसुंदर गुजर यांनी फिर्याद दिली आहे  पुढील कारवाई पोलीस निरीक्षक घनश्याम बलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here