मांडूळ तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 15, 2020

मांडूळ तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात

 मांडूळ तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात



नगरी दवंडी

बारामती :  मांडूळ तस्करी प्रकरणी दोन जणांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेत मांडूळ व दुचाकीसह पुढील कारवाईसाठी संशयितांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल( दि.१४) रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास नक्षत्र गार्डन,बारामती येथे दोन अनोळखी इसम दुचाकीवरून संशयितरित्या फिरत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेत संशयीतांना ताब्यात घेतले गणेश लक्ष्मण गायकवाड (वय २५ ), ( रा. पाटण सांगवी, ता.आष्टी, जि.बीड) राजेंद्र उत्तम चांगण, (वय ५३) (रा. साखरवाडी, ता.फलटण, जि.सातारा ) अशी संशयितांची नावे आहेत.

दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान त्यांच्या कडील कापडी पिशवी मध्ये एक मांडूळ मिळाले. सदर मांडूळ बाबत चौकशी केली असता त्यांनी मांडूळ विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले. मांडूळ जवळ बाळगणे, त्याची विक्री करणे हा भारतीय वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा असून मांडूळ पासून पैशाचा पाऊस पडतो या अंधश्रद्धेमुळे मांडूळची लाखो रुपयांना तस्करी करण्यात येते.

सदरची कारवाई बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार जयंत ताकवणे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश कांबळे, नंदू जाधव, विनोद लोखंडे, रणजीत मुळीक, अबरार शेख यांनी केली.

No comments:

Post a Comment