वैद्यकीय आघाडीच्या अहमदनगर दक्षिण अध्यक्षपदी डॉ.भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 21, 2020

वैद्यकीय आघाडीच्या अहमदनगर दक्षिण अध्यक्षपदी डॉ.भोसले

 वैद्यकीय आघाडीच्या अहमदनगर दक्षिण अध्यक्षपदी डॉ.भोसले


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीच्या अहमदनगर दक्षिणच्या अध्यक्षपदी श्रीगोंदा तालुक्यातील डॉ. विक्रम बलभीम भोसले(कसरे) यांची नियुक्ती झाल्याचे पत्र नुकतेच भाजपा वैद्यकीय सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे व जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यानी दिले.
श्रीगोंदा तालुक्यातील डॉ. विक्रम बलभीम भोसले(कसरे) यांनी केलेल्या सामाजिक आणि वैद्यकिय क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन आ.चंद्रकांतदादा पाटील प्रदेश अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश व भाजपा वैद्यकिय आघाडी महाराष्ट्र प्रदेशाचे प्रभारी मा.आ.गिरीष महाजन यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी वैद्यकिय आघाडी अहमदनगर दक्षिण अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र नुकतेच भाजपा वैद्यकीय सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे व जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यानी दिले.या वेळी बोलताना डॉ.भोसले यानी सांगितले की विशिष्ट विचारांनी प्रेरित होऊन मी आजवर अनेक सामाजिक उपक्रम करून संघटनेत काम करत आहे. याची दखल घेऊन मला जी संधी/ जबाबदारी सोपविण्यात आली त्याचा उपयोग
भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकिय आघाडीचे पक्ष संघटन वाढविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे करणार. नियुक्त बद्दल खासदार सुजय विखे, माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड सर, बाळासाहेब महाडिक, तालुका अध्यक्ष संदीप नागवडे सर, विक्रम पाचपुते, नरेंद्र भोस यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here