दिवाळी पाडव्याला हंगेश्वर प्राथमिक शिक्षक मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 21, 2020

दिवाळी पाडव्याला हंगेश्वर प्राथमिक शिक्षक मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम

 दिवाळी पाडव्याला हंगेश्वर प्राथमिक शिक्षक मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
हंगा ः प्रत्येक वर्षी सामाजिक कार्यात सहभागी होणार्‍या  मंडळाकडून या वर्षी कोरोना योद्धांना सन्मानित करण्यात आले.या मंडळाने कोरोना काळात हंगा गावातील अनेक कुटुंबांना किराणा किट,प्राथ.शाळेस दोन संगणक संच,न्यू इंग्लिश स्कूल हंगे या शाळेस क्रिडा साहित्य वाटप करण्यात आले. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना या वैश्विक महामारीने संपुर्ण जग व्यापले असताना डॉक्टर, नर्स, पोलीस, शिक्षक, इतर विभागातील कर्मचारी यांनी या आजारापासून संरक्षण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले.या सर्वांची जान ठेऊन व या सर्वांना प्रेरणा देण्यासाठी हंगेश्वर प्राथ.शिक्षक मंडळ, हंगा यांनी प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र,शाल,श्रीफळ देऊन या सर्वांचा सन्मान केला आहे.
यामध्ये राज्यासमोर एक आदर्श निर्माण करणारे पारनेर तालुकाचे लोकप्रिय आमदार .निलेश लंके साहेब डॉक्टर प्रतिनिधी डॉ.कोल्हे, डॉ.जीवन कमलाकर म्हात्रे शिक्षक प्रतिनिधी  किसन दुधाडे सर,श्री.सुदर्शन आबुज सर , आरोग्य सेविका   सौ.बेलोटे मॅडम आशा सेविका प्रतिनिधी-  सौ.सोंडकर भाग्यश्री ग्रामपंचायत प्रतिनिधी श्री.राजेंद्र जरे अंगणवाडी सेविका सौ.अलका नगरे या सर्वांचा सन्मान केला.
या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष श्री.पोपट शिंदे सर,उपाध्यक्ष श्री.किरण रासकर,सचिव *श्री.सुर्यकांत काळे, सदस्य श्री.आबा दळवी,सुरेश नगरे,बाबा काळघुगे,संतोष शिदें,सतिष शिंदे,नगरे नितीन,संदिप शिदें,सुनिल शिंदे,अजय सोनवणे,सोमनाथ शिंदे,निळकंठ बोनेकर,सचिन शिंदे,संजय गायकवाड,रोहिदास दळवी,मंगेश काळे,किसन शिंदे तसेच सौ.धनश्री काळघुगे,सौ.मनोरमा दळवी,सौ.अंजली काळे उपस्थित होते.आपण केलेल्या कामाची दखल घेऊन हंगेश्वर शिक्षक मंडळांनी केलेल्या सन्मानाबद्दल प्रातिनिधीक स्वरूपात श्री.दुधाडे सर, सौ. अलका नगरे यांनी मंडळाचे धन्यवाद मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here