पोलिस दल व जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने एकत्रित उपक्रम राबवू - अविनाश घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 25, 2020

पोलिस दल व जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने एकत्रित उपक्रम राबवू - अविनाश घुले

 पोलिस दल व जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने एकत्रित उपक्रम राबवू - अविनाश घुले

कोतवालीचे पो.नि.राकेश मानगांवकर यांचे हमाल पंचायतीच्यावतीने स्वागत


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोतवाली पोलिस स्टेशनच्या निरिक्षकपदी राकेश मानगांवकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने त्यांचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी स्वागत करुन सत्कार केला. याप्रसंगी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकाण, नंदू डहाणे, भाऊसाहेब पांडूळे, तबाजी कार्ले, सुसे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अविनाश  घुले म्हणाले, नगर शहरातील कायदा-सुव्यवस्था पोलिसांच्या सहकार्याने चांगल्यापद्धतीने सुरु आहे. कोरोना काळात पोलिसांच्या सहकार्याने अनेक चांगले उपक्रम शहरात राबविले गेले. त्यामुळे जनतेच्या मनात पोलिसांबद्दल आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर यांनी यापूर्वीही नगरमध्ये असतांना चांगले काम करुन आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. आत पुन्हा त्याच जोमात नगर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतील, यात शंका नाही. पोलिस दल व जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने एकत्रित उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी पो.नि.राकेश मानगांवकर म्हणाले, नगर शहरातील अनेक संस्था, संघटनांचे पोलिस दलास नेहमीच सहकार्य असते. त्यांच्या बरोबर विविध उपक्रम राबवून शहरात एक विश्वासाचे नाते निर्माण होत आहे. पोलिस दलाच्यावतीने नागरिकांची सुरक्षा व सेवा देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. सर्वांच्या सहकार्याने नगरमध्ये चांगले उपक्रम राबवू. सध्या दिवाळीच्या सुट्टया असल्याने नागरिकांनी आपल्या मालमत्तेची काळजी घ्यावी. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी गर्दी करु नये, शासनाने वेळावेळी दिलेल्या सूचनेचे व  नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.

No comments:

Post a Comment