भाजपा संपर्क कार्यालयातून लोकसंवाद साधावा- खा. सुजय विखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, November 25, 2020

भाजपा संपर्क कार्यालयातून लोकसंवाद साधावा- खा. सुजय विखे

भाजपा संपर्क कार्यालयातून लोकसंवाद साधावा- खा. सुजय विखे

नगरसेवक रामदास आंधळे यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भाजप हा पक्ष सर्व सामान्य जनतेचा पक्ष आहे. केंद्र सरकारच्या योजना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वंचीत घटकापर्यत घेवून जाण्याचे काम करावे. या माध्यमातून आपण सर्वजन जनतेचा विश्वास संपादन करू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील विविध घटकातील नागरिकांचा विचार करून त्यांच्यासाठी विविध योजना निर्माण केल्या आहेत. या योजना भाजपा संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांपर्यत पोहचवाव्या. नगरसेवक रामदास आंधळे यांनी पारिजात चौक येथे भाजपा संपर्क कार्यालय सुरू करून जनतेशी लोकसंवाद साधावा असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले.
पारिजात चौक येथे नगरसेवक रामदास आंधळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खा. सुजय विखे यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाध्यक्ष महेंद्रभैय्या गंधे, उपमहापौर मालनताई ढोणे, सभागृह नेते मनोज दुलम, नगरसेवक स्वप्निल शिंदे, रविंद्र बारस्कर, राहुल कांबळे, राहुल आंधळे, माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी, अक्षय कर्डिले, सतिष शिंदे, संजय ढोणे, किशोर वाकळे, संपत नलावडे, उदयोजक दिपक नागरगोजे, अ‍ॅड. गोरख पालवे, डॉ. रंगनाथ सांगळे, बाबासाहेब सानप, बाळासाहेब आंधळे, बबन नांगरे, अमोल आंधळे, विशाल साबळे, कुमार नवले, शिरीष जानवे, संतोष बलदोटा, वैभव खांडरे, विक्रम कराचीवाले, निरज गांधी, ऋतेश सोनीमंडलेचा, अजित पवार, योगेश कटारिया, सुधीर पोटे, बबन चेमटे, अनिकेत भंडारी, अतुल गदादे, योगेश सिद्दम, विशाल नाकाडे, वसंत राठोड, अ‍ॅड.आर.टी.शर्मा आदी उपस्थित होते.
महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, शहरामध्ये भाजपा पक्ष वाढविण्याचे काम सुरू आहे. पक्षाचे विचार सर्वांनपर्यत घेवून जाण्याचे काम आम्ही सर्वजन करित आहोत. मनपाच्या माध्यमातून शहरामध्ये विविध विकास कामे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छते संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी स्वत: हातात झाडू घेवून स्वच्छता केली. त्यामुळे समाजामध्ये जनजागृती होण्याचे काम झाले. त्यांनी देशामध्ये स्वच्छता सर्व्हेक्षण अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. या स्पेर्धेमध्ये नगर मनपाने भाग घेवून आपल्या स्वच्छतेच्या कामाचा ठसा देशपातळीवर उमटविला आहे. नगरसेवक रामदास आंधळे हे समाजामध्ये काम करित आहेत. त्यांच्या माध्यमातून भाजप पक्ष वाढीसाठी नक्कीच मदत होईल असे ते म्हणाले. नगरसेवक रामदास आंधळे म्हणाले की, भाजपा संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही करित आहोत. संपर्क कार्यालयामुळे नागरिकांशी संवाद ठेवण्याचे काम केले जाते. प्रभागातील विविध प्रश्न समजण्यास मदत होते. उपनगराच्या विकासासाठी  या भाजपा कार्यालयाच्या माध्यमातून मदत करू त्याच बरोबर भाजपा पक्ष वाढण्यास मदत होईल असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here