रोटरीच्या माध्यमातून लवकरच दिव्यांग वृद्ध नागरिकांसाठी वृद्धाश्रमाची उभारणी : डॉ. कांकरिया - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 21, 2020

रोटरीच्या माध्यमातून लवकरच दिव्यांग वृद्ध नागरिकांसाठी वृद्धाश्रमाची उभारणी : डॉ. कांकरिया

रोटरीच्या माध्यमातून लवकरच दिव्यांग वृद्ध नागरिकांसाठी वृद्धाश्रमाची उभारणी : डॉ. कांकरिया

‘रोटरी निवारा’ वसाहती मधील दिव्यांग नागरिकांसमवेत दिवाळी सेलिब्रेशन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरच्या रोटरी क्लबच्या वतीने एमआयडीसी मध्ये दिव्यांग बांधवांसाठी बांधून दिलेली वसाहत हा जगातील एकमेव प्रकल्प आहे. उपक्षित वर्गांची गरज पूर्ण करण्यासाठी रोटरी क्लब कायम मदत कार्य करत आहे. आता रोटरीच्या माध्यमातून लवकरच दिव्यांग वृद्ध नागरिकांसाठी वृद्धाश्रमाची उभारणी करण्यात येणार आहे. दिव्यांग बंधू भगिनींच्या समवेत मला वाढदिवस साजरा करता आला हे माझे परम भाग्य आहे.असं प्रतिपादन जागतिक नेत्रतज्ज्ञ डॉ प्रकाश कांकरीया यांनी व्यक्त केलं आहे.
रोटरी क्लब अहमदनगर शाखेच्या वतीने दिपावलीनिमित्त कोणताही कार्यक्रमाचे आयोजन न करता सामाजिक जाणीवेतून रोटरी क्लबच्या वतीने एमआयडीसी मध्ये अंध व अपंग नागीरीकांसाठी बांधण्यात आलेल्या ‘रोटरी निवारा’ या वसाहती मधील दिव्यांग नागरिकांना उबदार ब्लँकेट व दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांचे वाटप करून सामाजिक उपक्रमाने दिवाळी सेलिब्रेशन करण्यात आले.याच कार्यक्रमात क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांच्या वाढदिवस व बालदिनानिमित्त वसाहती मधील मुलांना खाऊ  वाटपवाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित बोरकर म्हणाले, रोटरी परिवार कायम आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी इतर घटकांना सामावून घेत आहे. रोटरी निवारा मधील सर्व बंधू भगिनी हे रोटरी परिवाराचे घटक आहेत. त्यांच्या समवेत दिवाळी साजरी करता आली हे आमचे भाग्य आहे. डॉ. प्रकाश कांकरिया यांच्या पासून प्रेरणा घेवून काम करत आहोत.प्रास्ताविक डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या, येथील नागरिक जरी शरीराने अंध असले तरी मनाने व विचाराने जागरूक व डोळस आहेत. रोटरी क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित बोरकर यांनी दिवाळीच्या आनंदात येथील सर्वांना सामावून घेत चांगला उपक्रम राबवला आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार सचिव सचिव पुरुषोत्तम जाधाव यांनी मानले. दीपावलीनिमित्त व बलादिनानिमित्त बालकांना व नागरिकांना भरपूर खाऊ व फराळाचे पदार्थ मिळाल्याचा आनंद सर्व नागरिकांच्या चेहर्‍यावर ओसोंडून वाहत होता.यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित बोरकर, सचिव पुरुषोत्तम जाधाव, डॉ.सुधा कांकरिया, निलेश वैकर, प्रशांत बोगावत, दादासाहेब करंजुले, महेश गोपाळकृष्णन, उद्दोजक दत्तात्रय जगताप, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या नगर शाखेचे अध्यक्ष संभाजी भोर आदींसह रोटरी निवारा वसाहती मधील नगरीक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment