शास्ती माफीची मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 21, 2020

शास्ती माफीची मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवा

 शास्ती माफीची मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवा

माजी महापौर दीप चव्हाण व नगरसेविका सौ. शीला चव्हाण यांची आयुक्तांना विनंती.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शास्तीमाफीत  75 टक्के सूट मिळविण्याकरिता नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत मालमत्ता धारकांना देण्यात आलेली आहे. सध्याची परिस्थिती व वसुलीमध्ये मिळालेला प्रतिसाद पाहता आणखी वाढीव 30 दिवसांची म्हणजेच 31 डिसेंबर 2020 पर्यंत शास्तीमाफी ची मुदत वाढविण्यात यावी,  सदर मुदतवाढ दिल्यास आत्तापर्यंत जमा झालेल्या 24 कोटीच्या रकमेत भर पडून ती रक्कम 100 कोटींपर्यंत पोहचू शकते. यामुळे  अहमदनगर महानगरपालिकेला आर्थिक उभारी मिळेल व मनपाच्या वसुली मोहिमेला भरपूर प्रतिसाद मिळेल, अशी विनंती माजी महापौर दीप चव्हाण व नगरसेविका सौ.शीला चव्हाण यांनी मा. आयुक्त यांचेकडे पत्राद्वारे केली आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात चव्हाण यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर राज्यासह देशात लॉकडाऊन केल्याने अनेकांचे रोजगार बंद पडून उपासमारीची वेळ आलेली होती. कोरोनाचा फटका अहमदनगर महानगर पालिकेने देखील अनुभवला आहे व अनुभवत आहे. अनेकांचे व्यवसाय बंद होते तर काही उद्योगधंदे बंद पडले. यामुळे महानगरपालिकेला मालमत्ता कर वसूल करण्यास अडथळे आले. आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या मालमत्ता धारकांसाठी मनपा च्यावतीने मालमत्ता करामध्ये अल्प प्रमाणात सूट देऊन देखील मालमत्ता धारकांनी याकडे कानाडोळा केल्याने परिणामी वसुली झाली नाही. अखेर आयुक्तांनी गेल्या महिन्यात शास्तीमाफीमध्ये 75 टक्के सूट दिल्यानंतर वसुलीच्या मोहिमेला गती प्राप्त झाली.
लॉकडाऊन मधून हळूहळू शिथिलता मिळत गेली तसतसे काही प्रमाणात का होईना व्यावसायिक दुकानदारांसह कामगारांचा रोजगार सुरु होण्यास मदत झाली. आर्थिक व्यवहार, खरेदी विक्री ला सुरुवात झाली. अशातच दिवाळी, पाडवा, भाऊबीज सारखे सणासुदीचे दिवस असल्याने मालमत्ताधारकांना यासंधीचा फायदा घेता आलेला नाही. यादरम्यान खर्च वाढल्याने नागरिकांना देखील आर्थिक चणचण देखील जाणवू लागली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here