शास्तीमाफितुन जमा झालेल्या पैशातून विकास कामे व्हावी, अन्यथा आंदोलन करू! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, November 25, 2020

शास्तीमाफितुन जमा झालेल्या पैशातून विकास कामे व्हावी, अन्यथा आंदोलन करू!

 शास्तीमाफितुन जमा झालेल्या पैशातून विकास कामे व्हावी, अन्यथा आंदोलन करू!

विरोधी पक्षनेते संपत बारस्करांचा इशारा...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मालमत्ताधारकांना दिलेल्या शास्तीमाफीतुन जमा झालेल्या जनतेच्या पैशामधुन जनतेसाठीच लोकोपयोगी कामे करावयाची असल्याने ही रक्कम या पुढील कामांसाठी राखीव ठेवण्यात यावी असे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांकडून आपल्या दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणार्‍या संभाव्य परिणामाची सर्वस्व जबाबदारी आपणावर राहील असा इशारा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकेलवार यांना एका निवेदनाद्वारे दिल आहे.
मनपाने दिलेल्या शास्ती माफीमुळे मालमत्ता धारकांकडून वसूल करण्यात आलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी मुळे महानगरपालिकेचे आर्थिक स्त्रोत वाढले आहे. महापालिकेत मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या रकमेमधून दुर्लक्षित प्रभागांमध्ये विकास कामे हाती घेण्यात यावीत अशी मागणीही बारस्कर यांनी केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात बारस्कर यांनी म्हटले आहे की, शहर व उपनगरांमधील अनेक मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात घरपट्टी व पाणीपट्टी ची थकबाकी असून त्यामध्ये शास्तीची रक्कम आकारण्यात आलेली आहे. गेल्या एक वर्षापासून संपूर्ण जगाला कोरोना संसर्गाने थैमान घातलेले असून हजारो लोक यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. लॉक डाऊन मुळे अक्षरश: अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली असून रोजगार संपूर्ण कोलमडलेला आहे. आर्थिक परिस्थिती अभावी मालमत्ताधारक घरपट्टी, पाणीपट्टी भरू शकत नाहीत. करामध्ये आकारण्यात आलेली शास्तीची रक्कम माफ केल्यास अनेक मालमत्ताधारक आपली घरपट्टी व पाणीपट्टी भरतील व यामधून महानगरपालिकेस मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर जमा होईल.
शास्ती माफीच्या निर्णयामुळे ज्या मालमत्ताधारकांकडे अनेक वर्षापासून ची थकबाकी होती अशा मालमत्ताधारकांनी सदरील योजनेचा लाभ घेतला. या मधून महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न वाढलेले आहे. महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थिती अभावी गेल्या 1 वर्षापासून महानगरपालिका हद्दीमधील कोणत्याही प्रभागामध्ये विकास कामे करता आली नाही. शास्ती माफी मुळे मालमत्ताधारकांनी भरलेल्या घरपट्टी/ पाणीपट्टीमुळे महानगरपालिकेला मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे. महानगरपालिकेकडे मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या रकमेमधून प्रभागांमध्ये विविध विकास कामे हाती घेणे अत्यंत आवश्यक आहे. असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here