वाढीव वीज बिलाच्या विरोधात उद्या मनसेचा मोर्चा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, November 25, 2020

वाढीव वीज बिलाच्या विरोधात उद्या मनसेचा मोर्चा

 वाढीव वीज बिलाच्या विरोधात उद्या मनसेचा मोर्चा


अहमदनगर ः
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन काळातील आलेले सर्व सामान्य जनतेला लाईट बिल माफ करावे यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर महावितरण विरोधात उद्या मोर्चा काढण्यात येणार असून त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्या महावितरण विरोधात  आंदोलन करणार आहेत. सहकार सेनेचे प्रदेश सरचिटणीस श्री अनिल चितळे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, जिल्हाध्यक्ष दत्ता कोते, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10:30 वाजता नगर बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा, पंचपीर चावडी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्च्यात उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, उपतालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, कार्यकर्ते व जिल्ह्यातील सर्व मनसे अंगीकृत संघटना व जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे जिल्हाप्रमुख सचिन डफळ यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here