ओबीसीच्या कोट्याला हात न लावता मराठा आरक्षण द्यावे! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, November 23, 2020

ओबीसीच्या कोट्याला हात न लावता मराठा आरक्षण द्यावे!

 ओबीसीच्या कोट्याला हात न लावता मराठा आरक्षण द्यावे!

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मागणी...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे असे आमचे मत आहे. त्यासाठी ओबीसीच्या ताटातला घास पळवला जाऊ नये, ओबीसीच्या कोट्याला हात न लावता मराठा बांधवांना वेगळे आरक्षण जरूर द्यावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नगर जिल्हा अध्यक्ष दत्ता जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात श्री जाधव यांनी म्हटले आहे की. राज्यात जरी ओबीसी, व्हीजेएनटी, एस बी सी असे तीन उपगट असले व व्हीजेएनटी चे आणखी चार उपगट असले तरी या सर्व जाती जमाती केंद्रीय यादीत ओबीसी म्हणूनच ओळखल्या जातात. तसेच पंचायत राज्यातील राजकीय आरक्षणासाठी त्या सर्वांना ओबीसी म्हणून मान्यता आहे. केंद्रीय पातळीवरील शिक्षण व नोकर्‍यांत तसेच पंचायत राज्यातील राजकीय आरक्षणात या सर्वांना मिळून 27 टक्के जागा आरक्षित आहेत. मात्र आपल्या राज्यात अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण 20टक्के असुन ओबीसी व्हीजेएनटी एस बि सि यांना अनुक्रमे 19 टक्के 11 टक्के व 2 टक्के असे मिळून 32 टक्के आरक्षण दिले जातेय. तथापि मेडिकल व इंजिनिअरिंगच्या जागांमध्ये एसबीसी चे 2% हे ओबीसी तुन दिले जात असल्याने ओबीसीला अंततः फक्त 17 टक्के आरक्षण मिळते आदिवासी बहुल अशा नंदुरबार पालघर गडचिरोली आदी जिल्ह्यांमध्ये तर ते अवघे सहा ते नऊ टक्के दिले जाते. या आरक्षणामुळे आजवर सुमारे 5 लाख व्यक्तींना राजकीय सत्तेची पदे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका इत्यादींमध्ये मिळाली लाखो विद्यार्थी एम पी एस सी, यूपीएससी परीक्षा पास होऊन राज्य व केंद्र सरकारच्या नोकर्‍यांमध्ये विविध पदांवर काम करू लागले. लाखो विद्यार्थी इंजिनिअर डॉक्टर वकील सीए झाले
आज हे आरक्षण संपवण्याचा दोन पातळ्यांवर घाट घातला जात आहे.
फुले शाहू आंबेडकरांच्या प्रगतिक महाराष्ट्राच्या बदनामीसाठी काही विरोधी व्यक्ती कार्यरत आहेत जाती-जातीत कलागती लावून राज्यातील शांतता व कायदा आणि सुव्यवस्था नष्ट करण्यासाठी हे कारस्थान चालू आहे. त्याला शासनाने तात्काळ आळा घालायला हवा.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here