घोडेगाव येथील घोडेश्वरी मंदिरात 11 लाखाची चोरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 21, 2020

घोडेगाव येथील घोडेश्वरी मंदिरात 11 लाखाची चोरी

 घोडेगाव येथील घोडेश्वरी मंदिरात 11 लाखाची चोरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
घोडेगाव ः नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवी मंदिरात गुरुवारी मध्यरात्री धाडसी चोरी झाली असून .मंदिर गाभार्‍यातील 17 किलो चांदी व त्यावरील हिरे असे एकूण 11 लाख रुपयांची चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.सोनई पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय थोरात यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली. मंदिर गाभार्यात ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.तसेच श्वान पथक देखील दाखल झाले होते.
घोडेगावचे ग्रामदैवत श्री घोडेश्वरी माता मंदिरात धाडसी चोरी झाल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.करोडो रुपयांच्या लोकवर्गणीतून देवी मंदिराचे भव्य काम उभे केले आहे.मागील वर्षीच मंदिराचे काम पूर्ण झाले होते. एवढ्या मोठ्या प्रसिद्ध मंदिरात असलेले लर्लीींं कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद आहेत, लर्लीींं कॅमेरे जर सुरु असते तर लाखो रुपयांची चोरी होण्यापासून रोखता आली असती. ट्रस्टीच्या हलगर्जीपणामुळे आज ही चोरी झाल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

No comments:

Post a Comment