हंगेवाडी येथे जागतिक शौचालय दिन व आवास साप्ताह अभियान उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 21, 2020

हंगेवाडी येथे जागतिक शौचालय दिन व आवास साप्ताह अभियान उपक्रम

 हंगेवाडी येथे जागतिक शौचालय दिन व आवास साप्ताह अभियान उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथे जागतिक शौचालय दिन व आवास साप्ताह अभियान उपक्रम राबविण्यात आले.
तालुक्यांतील हंगेवाडी येथे 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन व आवास साप्ताह अभियान उपक्रम राबविण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन वैयक्तिक शौचालय , शालेय स्वच्छता , अंगणवाडी स्वच्छता , परिसर स्वच्छता शाश्वत स्वच्छता इत्यादी बाबत जण जागृती करण्यात आली.
यावेळी गट विकास अधिकारी प्रशांत काळे , विस्तार अधिकारी कैलास जगताप, कृषी अधिकारी मनोज बनकर,मा.सरपंच संतोष रायकर, दत्तात्रय बापू जगताप, माजी संचालक श्रीगोंदा कारखाना तुळशीराम रायकर, भाऊसाहेब कोळपे,आप्पासाहेब धायगुडे तंटामुक्ती अध्यक्ष,स्वच्छ भारत मिशन कक्ष , घरकुल कक्ष कर्मचारी, सरपंच व सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी नवनाथ गोरे,मच्छिद्र इधाते, कृष्णा शंकर जाधव, जगदीश हंगेश्वर जाधव, सर्व लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here