महसूल अधिकारी तसेच कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 12, 2020

महसूल अधिकारी तसेच कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष

 देवदैठणमध्ये खाणपट्ट्याची परवानगी नसतांना दगड खाणी सुरू

महसूल अधिकारी तसेच कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष
लाखो रुपयांचा महसूल बुडाला.
  तालुक्यातील अनेक ठिकाणी विनापरवाना दगड खाणी, अवैध वाळू,माती ,मुरूम उत्खनन करण्यात येत असून महसूल विभागाच्या परवानगी आणि रॉयल्टी न काढता असे धंदे केले जात असल्याने शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

गावातील कुठलाही गट अजून  
मायनिंग मध्ये समाविष्ट नाही...
  याबाबत श्रीगोंदा  महसूल विभागाचे संबंधित अधिकारी यांना विचारले असता या गावातील एकही गट खान पट्टा साठी परवानगी घेण्यात आलेला नाही असे सांगत पंचनामा करून कारवाई करणार असल्याचे सांगितले.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील वनजमिनीवर माळढोक आरक्षित क्षेत्र आहे. तसेच तालुक्यात इको सेन्सिटिव्ह झोन असल्याने अगोदरच स्टोन क्रेशर ला परवानगी मिळत नसताना देवदैठण या गावात खानपट्टा परवानगी न घेता दगड खांणी सुरू करण्यात आल्याच्या तक्रार पर्यावरण रक्षकानी केली आहे. याबाबतीत महसुलचे खनिज विभागांने दिलेल्या माहितीनुसार या गावात मायनिग परवानगी साठी कुठलाही गट समाविष्ट नसल्याची माहिती समजते.
   तालुक्यात मोठ्या  प्रमाणात अवैध वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असताना गावो गावच्या नदी नाल्यातील वाळू उपसा साठी कुठलाही लिलाव नसताना अवैध वाळू धंदा तेजीत असतानाच अनेक ठिकाणी महसूलकडे कुठल्याही प्रकारची महसूल न भरता मुरूम ,माती आणि दगड खाणी मधून दगड काढला जात आहे. दगड खाण सुरू करण्यासाठी खांणी मधील दगड उपसा करण्यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडून परवानगी घेऊन मायनिंग साठी गट समाविष्ट करावा लागतो. मात्र तालुक्यातील देवदैठण या गावात कुठलाही खाणं पट्टा नसल्याने मोठ्या प्रमाणात दगड खांणी घेण्यात आल्या आहेत. यातून दगड काढून महसूलकडे रॉयल्टी न भरता हा दगड स्टोनक्रेशर मध्ये फोडून खडी काढण्यात येत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते यांनी गावातील सर्व दगड खाणीचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment