करंदी येथे नवरात्रोत्सवानिमित्त पथनाट्य सादर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 26, 2020

करंदी येथे नवरात्रोत्सवानिमित्त पथनाट्य सादर

 ’आडवाटेच्या टिम’चे पथनाट्य समाजहितासाठी ः ठाणगे

करंदी येथे नवरात्रोत्सवानिमित्त पथनाट्य सादर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः सध्या कोरोना आजार नियंत्रणात येण्याची शक्यता नाही कोरोनाचा संसर्ग वाढत असताना समाजप्रबोधनासाठी , ’टिम पारनेरची जरा आडवाटेची ’ या टिम ने कोरोना आजाराच्या पार्श्व भुमीवर समाजावर होणारे दुष्परिणाम या विषयी सादर केलेल पथनाटय समाजप्रबोधनासाठी उपयोगी असल्याचे प्रतिपादन मळगंगा देवी देवस्थान ट्रस्ट करंदीचे सचिव शिवाजीराव ठाणगे यानी केले .
   पारनेर तालुक्यातील करंदी येथे नवरात्र उत्सवानिमित्त प्रा . तुषार ठुबे दिग्दर्शीत .कोरोनाचा महाभयानक राक्षस या विषयावर समाजप्रबोधनासाठी पथनाट्य सादर करण्यात आले त्याप्रसंगी आडवाटेच्या टिमला शुभेच्छा देताना ते बोलत होते . यावेळी देवस्थानचे विश्वस्त जिजाभाऊ थोरात संतोष थोरात भाऊसाहेब पिंपरकर , कवी सोमनाथ चौधरी , स्वप्नाली ठाणगे बबनराव आतकर बबन चौधरी तंटामुक्ती अध्यक्ष राधुजी ठाणगे सावळेराम ठाणगे यांच्यासह ग्रामस्थ सामाजिक अंतर ठेवुन उपस्थित होते . शिवाजीराव ठाणगे पुढे बोलताना म्हणाले की या टिमने सादर केलेले पथनाटय खर्‍या अर्थाने समाजाला सुरक्षीत ठेवण्यासाठी आहे त्याचा अर्थ समजुन घेण्याची गरज आसुन हे पथ नाटय राज्यभर नेण्याची गरज असल्याचे गौरव उद्गगारही काढले या पथनाटयाचे प्रा . तुषार ठुबे दिग्दर्शक आसुन प्रा . मिलिंद देंडगे , लोकशाहीर दत्ता जाधव कवी सोमनाथ चौधरी , कवी अशोक गायकवाड यांच्यासह पंचवीस युवक युवतीचा सहभाग आहे. शहाजी ठाणगे यानी सुत्रसंचालन केले तर जिजाभाऊ थोरात यानी आभार मानले

No comments:

Post a Comment