नगर जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे आक्रमक आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 26, 2020

नगर जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे आक्रमक आंदोलन

 भक्तांच्या दर्शनासाठी मंदिरे सरकारने उघडावीत अन्यथा कुलूप तोडू ः कुलकर्णी 

नगर जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे आक्रमक आंदोलन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः राज्यभरात एकाच दिवशी भक्तांच्या दर्शनासाठी ताबडतोब मंदिरे सरकारने उघडावी विश्वहिंदू परिषदेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे.यासाठी  मंदिरे हि हिंदूंची शक्ती केंद्रे आहेत.भक्तांच्या दर्शनासाठी ताबडतोब मंदिर उघडावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद करोडो हिंदू समाजाच्यावतीने करत आहे,यासाठी विश्व हिंदू परिषद हा समस्त हिंदू समाजाचा आवाज आहे.गेली आठ महिने बंद असलेली देवालय भक्तांच्या दर्शनासाठी ताबडतोब मंदिरे सरकारने उघडावी अन्यथा कुलूप तोडू असा इशारा पश्चिम महाराष्ट्राचे प्रांतसह मंत्री विवेक कुलकर्णी यांनी आंदोलनप्रसंगी दिला.माळीवाडा येथील नगर शहराचे ग्राम दैवत श्री विशाल गणपती मंदिराच्या दारात नगर जिल्हा विश्वहिंदू परिषदेने मंदिर उघडावे,सरकारला जाग यावी यासाठी हलगी व टाळ वाजवून संतांच्या हस्ते महाआरती करून जनआंदोलन केले.

   याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचे प्रांतसह मंत्री विवेक कुलकर्णी बोलत होते.यावेळी प्रांतसेवा विभाग प्रमुख दादाराम ढवाण,संत मुरली दास महाराज,रा.स्व.संघाचे संत संपर्क ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,कार्याध्यक्ष अँड.जय भोसले,मठ मंदिर संपर्क समितीचे हरिभाऊ डोळसे,प्रांत धर्म प्रसार सह प्रमुख मिलिंद मोभारकर,दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप,गणेश मंदिराचे विश्वस्त पंडितराव खरपुडे,बजरंग दलाचे अध्यक्ष गौतम कराळे,धर्मप्रसार प्रमुख अनिल देवराव,सह प्रमुख कल्याण गाडे,अनिल रामदासी,निलेश चिपाडे, प्रफुल्ल सुरपुरिया,मुकुल गंधे,ज्ञानेश्वर मगर,मोहन पोकळे,राजेंद्र चुंबळकर,राजेश सटाणकर,बाली जोशी,तुषार मुळे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले कि, हिंदू समाज हा धार्मिक व सहिष्णू आहे त्याचा अंत सरकारने पाहू नये.शेकडो वर्षांपूर्वीची दिंडीची परंपरा औरंगजेबाच्या काळातही सुरु होती.परंतु कोरोना या महामारीच्या काळात हिंदू समाज हा धार्मिक व सहिष्णू असल्याने वारी रद्द करून नियमांचे पालन केले.मंदिरांवर अनेक गावांची धर्मस्थानांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. महाराष्ट्र ही जागृत धर्मस्थानांची भूमी आहे. देवींची साडेतीन शक्तीपीठे, बारा जोतिलिंगा पैकी पाच जोतिर्लिंग,अष्टविनायक मंदिरे,जेजुरी जोतिबा सारखी कुलदैवते संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत एकनाथ अशा अनेक संतांच्या कर्मभूमी पंढरपूर सारखे महाराष्ट्राचे आराध्य दैवत,शनिशिंगणापूर, शिर्डी सारखे श्रध्दास्थान,भटक्यांची पंढरी मढी कानिफनाथ देवस्थान,अश्या अनेक तीर्थक्षेत्रांचे अर्थव्यवहार सद्य कालात ठप्प झाले आहेत.मंदिरांच्या आश्रयाने असलेले अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. गुरव,पुजारी व पुरोहित या वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे.अनेक देवालयांवर सरकारचे दृष्टी आहे.तेथील दानपेटीतील धन सरकारी योजनांसाठी वापरले जाते.आषाढीवारीत मा. मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाची पूजा केली.सर्वसामान्य वारकरी मात्र विठ्ठलाच्या दर्शनासाठी व्याकुळ आहे.लवकरच कार्तिक वारी येत आहे.नवरात्र काळात देवीच्या दर्शनासाठी कोट्यवधी भाविक जातात अब्जावधी रुपयांची उलाढाल या काळात मंदिरांच्या परिसरात होत असते.हजारो लोकांची वर्षभराची रोजीरोटी ची व्यवस्था होत असते.हे सगळे सरकारच्या निष्काळजी पणाने ठप्प  झाले आहे.दसरा-दिवाळी मध्ये देवाला साक्षी ठेवून नवीन वस्तूंची खरेदी हिंदू समाज करत असतो.अशा प्रसंगी देवतेचे देवालय उघडी नसतील तर श्रद्धावान हिंदूंचे आर्थिक व्यवहारही कमी होतील.अशा विविध कारणांसाठी सर्व साधुसंत, कीर्तनकार,मंदिरांचे विश्वस्त यांच्या आग्रहामुळे परिषदेने माननीय राज्यपाल,माननीय मुख्यमंत्री,सर्व जिल्हाधिकारी,लोकप्रतिनिधी यांना निवेदने दिली आहेत.हिंदू समाज खूप संयमी आहे.मा.मुख्यमंत्री यांनी   आवाहन केले.त्याप्रमाणे  दहीहंडी ,गणपती असे सगळेच महत्त्वाचे सण साधेपणाने घरातच साजरे केले आता हिंदू समाजाचा संयम संपत चालला आहे.आपल्या श्रद्धेय देवतेचे दर्शन घेता येऊ नये याची वेदना आता वाढत चालली आहे.सरकारने समाजाचा आक्रोश लक्षात घ्यावा.हिंदुत्वनिष्ठ असलेल्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील कोट्यवधी हिंदूंच्या भावनांचा विचार करावा व  देवालये भक्तांसाठी खुली करावीत.सरकारला जाग यावी.म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक मंदिरा समोर शंख ढोल यांचा नाद करून आरतीचे आयोजन परिषदेने केले आहे. मंदिरे जर सरकारने  उघडली नाहीत तर  विश्व हिंदू परिषद तीव्र आंदोलन करेल.असा इशारा विवेक कुलकर्णी यांनी दिला.                                                                 सूत्र संचालन जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,कार्याध्यक्ष अँड जय भोसले यांनी प्रास्तविक केले.गौतम कराळे यांनी आभार मानले.            


No comments:

Post a Comment