येत्या काळात नांदूर पठार गावचा चेहरा-मोहरा बदलणार ः आ. लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, October 14, 2020

येत्या काळात नांदूर पठार गावचा चेहरा-मोहरा बदलणार ः आ. लंके

 येत्या काळात नांदूर पठार गावचा चेहरा-मोहरा बदलणार ः आ. लंके

आ.निलेश लंके यांच्या हस्ते नांदूर होतील पठार येथील विविध विकास कामांचा शुभारंभ !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना महामारीचे गंभीर संकट उभे असतानाही भरघोस असा निधी मतदार संघासाठी उपलब्ध केला आहे.व त्या निधीच्या माध्यमातून मतदार संघातील विविध गावात विकासाची दूरदृष्टी ठेवून समाजोपयोगी योजना व शासकीय निधीचा सदुपयोग करत विकास कामाचा वाढता आलेख तालुक्यात दाखवून दिला आहे.

     सोमवारी नांदूर पठार तालुका पारनेर येथे झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी नांदूर पठार येथील महिलांना 115 पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले तर 2515 या ग्राम विकास निधी अंतर्गत दशलक्ष रुपयाचा रस्ता काँक्रिटीकरण, तसेच जि.परिषद सदस्या. राणीताई लंके व पं.समीती सदस्या,सौ.सरूबाई वाघ यांच्या निधीतुन वीस बाकडे,सार्वजनिक विहिरीसाठी दोन लक्ष 70 हजार रुपयांची स्वतंत्र डीपी,आठ लक्ष रुपयाची व्यायाम शाळा तसेच 5 लक्ष रुपयाचे हायमॅक्सचा उद्घाटन शुभारंभ आमदार निलेश लंके यांच्या हस्ते संपन्न झाला .
माझ्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत नांदूर पठार गावचा मोठा वाटा आहे.मला अडचणीच्या वेळेस खांद्यावर घेऊन मला साथ देणार्‍या या गावाने मला आधार दिला त्याचा बॅकलॉक मी येत्या काळात विकासाच्या मार्गाने भरून काढनार आहे.आज किमान पन्नास लक्ष रुपयाचा विकास कामांचा शुभारंभ झाला असून या पुढील काळातही निधी उपलब्ध करून देत नांदूर पठारचा चेहरामोहरा बदलणार आहे. असे आमदार लंके यांनी शुभारंभाच्या जाहीर सभेत नांदूर पठार करांना आश्वासित केले.
     यावेळी आमदार लंके यांच्या समवेत माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी, निलेश लंके प्रतिष्ठानचे प्रांत उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी,वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे,युवा नेते विजय औटी,अंकुश पायमोडे,रमेश वाघ,डॉक्टर कावरे,पत्रकार शरद झावरे,सचिन पठारे, संभाजी वाळुंज, किशोर ठुबे,चंदू ठुबे,सोन्या नवले, अमोल ठूबे,पोपट गुंड,श्रीधर झावरे, बाळासाहेब लंके, मंगेश लंके, सुहास साळुंखे,दिपक मुळे, दादा सुंबे, विजय दिवटे,माजी सरपंच आर आर राजदेव,मुंबई प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनेश शेठ घोलप, नांदूरपठारचे माजी सरपंच अर्जुन देशमाने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व निलेश लंके प्रतिष्ठानचे अनेक पदाधिकारी हितचिंतक, सहकारी मित्र व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here