कर्जतच्या प्रभाग 4 मध्ये महिलांची बैठक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 7, 2020

कर्जतच्या प्रभाग 4 मध्ये महिलांची बैठक

 कर्जतच्या प्रभाग 4 मध्ये महिलांची बैठक


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः सर्व महिलांनी आपले घर अंगण व परिसर स्वच्छ ठेऊन आपल्या कर्जतची ओळख महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे प्रतिपादन सौ सुनंदाताई पवार यांनी कर्जत येथील प्रभाग क्र 4 मधील महिलांच्या बैठकीत व्यक्त केले.
कर्जत येथे स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 अंतर्गत नगर येथील पंचायतीच्या प्रभाग क्र चार  मधील महिलांची बैठक अमरसिंह विद्या प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित आली या बैठकीत आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर  माजी जी. प. सदस्या सौ मोहिनी घुले, विरोधी पक्ष नेत्या सौ पूजा म्हेत्रे, नगरसेविका मनीषा सोनमाळी, नगरसेविका मोनाली तोटे डॉ शबनम इनामदार यावेळी उपस्थित होत्या.
कर्जत नगर पंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2021 मध्ये सहभाग घेतला असून यामध्ये कर्जत-जामखेड शहरांना महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करून द्यायची आहे यासाठी घराघरातील महिलांनी आपले अंगण व परिसर स्वच्छ राहील यासाठी विशेष सहभाग घ्यायचा आहे असे आवाहन करत सौ सुनंदाताई पवार यांनी आगामी काळात काळात 90 दिवसात आपल्याला मोठे काम उभे करायचे असल्याचे सांगत यामध्ये नागरपंचायतचे मुख्याधिकारी व सर्वच मोठी मेहनत घेत आहोत श्रमदान केले जात असून त्यामध्ये आपणही सहभागी झाले पाहिजे असे सांगताना आ रोहित पवार यांनी आपल्या मतदार संघात विविध विकास कामाचा चंग बांधला असून बचत गटाची चळवळ वाढवायची आहे, आरोग्य विषयक लवकर कार्यक्रम घेणार आहोत भीमथडीच्या जत्रेत मतदार संघातील 100 बचत गटाना संधी देणार आहोत असे म्हटले. आपल्या प्रभागात झाडे लावण्याचे आव्हान करताना प्रभाग प्रभागात होणार्‍या स्पर्धेत आपलाच प्रभागाचा नंबर कसा येईल यादृष्टीने आपण सर्व काम करू या असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमरसिंह विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब तोरडमल व प्रभागातील कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment