भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा नेटकेंचा राष्ट्रवादीत प्रवेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 7, 2020

भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा नेटकेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

 भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा नेटकेंचा राष्ट्रवादीत प्रवेश


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः माजी उपसभापती व भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ कांताबाई नेटके यांचे सह सौ नीता भाऊसाहेब पिसाळ यांनी  आज सौ सुनंदाताई पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत भाजपाला पुन्हा धक्का दिला. गायकरवाडी व बर्गेवाडी येथे झालेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 अंतर्गत महिला सुसंवाद कार्यक्रमात आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार यांनी महिलांबरोबर चर्चा केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब नेटके यांनी प्रास्ताविक केले तर यावेळी मा जिल्हा परिषद सदस्या सौ मोहिनी घुले, विरोधी पक्ष नेत्या पूजा म्हेत्रे, नगरसेविका मनीषा सोनमाळी, नगरसेविका मोनाली तोटे, डॉ शबनम इनामदार, सौ कांताबाई नेटके, कुशाभाऊ नेटके, संतोष म्हेत्रे, स्वाती माने आदी सह अनेक जण उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीत एकमेव सदस्य असताना उपसभापती पदाला गवसणी घालून चमत्कार घडवणार्‍या व सध्या भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा असलेल्या सौ कांताबाई बापूसाहेब नेटके यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

No comments:

Post a Comment