शिवसेना नेत्यांचे झाले मनोमीलन ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 8, 2020

शिवसेना नेत्यांचे झाले मनोमीलन !

 शिवसेना नेत्यांचे झाले मनोमीलन !

संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख व विक्रम राठोडांनी घडवला जुन्या-नव्या नेत्यांचा मेळ ..

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ, असे सांगण्यासाठी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हे रात्री साडेबारा वाजता मला भेटले होते. मात्र मी त्यांना वरिष्ठांचा निर्णय पाळणार असल्याचे सांगत ’जय महाराष्ट्र’ केला,
        ‘सामना’ या वृत्तपत्र मधून नगर शहरासाठी जाहीर झालेले पदाधिकारी हे वैध आहेत. इतर सर्व पदाधिकारी हे अवैध आहेत. त्यांनी कुठेही त्यांच्या पदाचा वापर करू नये असा इशाराही यावेळी देण्यात आला. पुढील आठवड्यात नगर शहरात नक्षत्र लॉन येथे सभासद नोंदणीची मिटिंग होऊन कार्य सुरु होणार आहे.
  - भाऊ कोरगावकर शिवसेना संपर्कप्रमुख


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत निर्माण झालेली दुफळी जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे. स्व.अनिल भैय्या राठोड यांची आमदारकी ज्या गटातटामुळे गेली. त्या गटांना एकत्र आणून जुन्या-नव्या नेत्यांना एक संघ राहण्याची साद शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने घातली व त्यास शिवसेना संपर्कप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख व विक्रम राठोड, सर्व नगरसेवकांनी प्रतिसाद देत सर्व जुन्या-नव्यांचा मेळ घालत शिवसेनेचा ढासळत असलेला बुरुज भक्कम करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शहरातील शिवसैनिकांत उत्साह संचारला आहे.

आज पाईपलाईन रोडवरील कोहिनूर मंगल कार्यालयात शिवसेनेच्या नेत्यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत सर्व सविस्तर चर्चा होउन गट-तट विसरून शिवसेना शहरात अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर याप्रसंगी म्हणाले की, आता गटतटाला पूर्णविराम देण्यात येऊन यापुळे फक्त शिवसेनाचा विचार करण्यात यावा. प्रत्येक शिवसैनिकांनी यापुढील काळात ठाकरे कुटुंबीयांचा मी आदेश मोडणार नाही अशी शपथ घ्या असे आवाहन केले. आता यापुढे शिवसेनेचे शहरातील सर्व निर्णय शिवालयमधूनच घेतले जातील पुढे ते असेही म्हणाले की व्यक्ती पूजा करण्यापेक्षा भगव्याचं तेज राखण्यासाठी भेदभाव विसरून मनातील किलमिष, जळमट काढून टाकावी व कोणीही स्वहितासाठी संघटनेला बदनाम करू नये. तसेच नगरमध्ये सोशल मीडिया तसेच वृत्तपत्र यांच्या हालचालींवर शिवसेनाभवन येथून एक टीम कार्यरत होऊन लक्ष घालणार आहे.त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट अथवा बातम्या दिल्यास त्यांच्यावर थेट कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
         शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे म्हणाले की शिवसेनेच्या सर्व  गटा-तटाचे हे कायमस्करुपी मनोमिलन आहे. यात जर कोणी मिठाचा खडा टाकण्याचे प्रयत्न केला, तर त्याची कायमस्वरूपी शिवसेनेकडून हाकलपट्टी करण्यात येईल. आता आपण सर्वांनी कायमस्वरूपी एकत्र काम करायचे आहे. आगामी काळात जर कोणी वर्तमानपत्र, फेसबूक, व्हाट्सअप ग्रुप व अन्य प्रसिद्धी माध्यमांसमोर एकमेकांच्या विरोधात स्टेटमेंट दिल्यास पक्षातून त्यास निलंबित करण्यात येईल. पक्ष शिस्त महत्त्वाची आहे. शिवसेना एकसंघ राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा आमदार निवडून येईल व आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना मोठे यश प्राप्त करून महापौरही शिवसेनेचाच होईल असा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
     विक्रम राठोड म्हणाले की आपणा सर्वांना पुढील काळात एकत्रपणे काम करायचे आहे. स्व.अनिल भैय्या राठोड यांचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे. आमदार व महापौर आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच असेल असेही ते म्हणाले.याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, महिला आघाडी प्रमुख आशाताई निंबाळकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, मा. महापौर अभिषेक कळमकर, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, मा. उपमहापौर अनिल बोरुडे, उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे, नगरसेवक सुभाष लोंढे, अनिल शिंदे, दत्ता जाधव, गणेश कवडे, श्याम नळकांडे, विजू पठारे, दीपक खैरे, अमोल येवले, मदन आढाव, निलेश भाकरे, संग्राम कोतकर, दीपक खैरे, परेश लोखंडे, योगीराज गाडे, प्रशांत गायकवाड, संजय शेंडगे, संतोष गेणाप्पा, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, विशाल वालकर यांच्यासह, शिवसैनिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
     नगर शहरातील शिवसेनेतील गट तट मतभेद मिटून शिवसेना भक्कम व्हावी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांना ठाकरे यांनी अनेक वेळा सूचना केल्या. पण गटतट मिटविण्यात संपर्क प्रमुखांना यश आले नाही. स्व. अनिल भैया राठोड यांनीही हे गटतट मिटविण्यासाठी प्रयत्न केला नाही पण त्यांचे पुत्र विक्रम राठोड यांनी हे गट तट मिटविण्यासाठी एक पाऊल उचलले व आज त्यांना यश आल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे नगर शहरात प्रमुख आव्हान असताना व महा विकास आघाडीची राज्यात सत्ता असल्यामुळे शिवसेनेत पक्ष वाढविण्यासाठी अधिक सतर्क राहावे लागणार आहे.
   शहरातील शिवसेनेला एकसंघ ठेवण्यात दिवंगत नेते अनिल राठोड यांनी कायम प्रयत्न केले. जनतेनेही शिवसेनेवर प्रेम केले. त्यामुळेच 25 वर्षे आमदारकी गाजविण्यात राठोड यांना यश आले. त्यांच्याच कार्याचा आदर्श घेऊन त्यांचे पूत्र माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी पाऊल उचलले. आज नाराज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शिवसेना एकसंघ ठेवण्यासाठी जुन्या-नव्या नेत्यांचा मेळ घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला.नगर शहरात शिवसेनेत दोन गट आहेत. गेल्या काही दिवसांपासून या गटामधील गटबाजी जास्तच दिसून येऊ लागली. त्याचा परिणाम शिवसेनेला महापौरपदापासुनही दूर रहावे लागले. इतर पदांवरही हात धुवून बसण्याची वेळ आली. विश्वास घात करीत ही पदे दूर गेली, असल्याची भावना कार्यकर्त्यांची झाली.दरम्यान, नुकत्याच झालेल्या स्विकृत नगरसेवकाच्या निवडणुकीत विक्रम राठोड यांना पद मिळत असूनही हे पद घेण्यास नकार दिला. अनिल राठोड यांनी निवडलेलीच यादी निश्चित करावी, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांचा एकप्रकारे सन्मानच केला. त्यामुळेच स्विकृत नगरसेवक निवडीनंतर आधी शिवालयात जाऊन (कै.) अनिल राठोड यांच्या चरणी येऊन आशिर्वाद घेतला.आता यापुढे धोका नको, तर शिवसेनेला एकसंघ ठेवण्यासाठी विक्रम राठोड यांनी पुढाकार घेतला आज नाराज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन गटातील मतभेद मिटविण्याचे त्यांनी प्रयत्न केला.


No comments:

Post a Comment