फुटीरवाद्यांनो हिंमत असेल तर, समोरासमोर स्टेजवर पुरावे घेऊन या! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 5, 2020

फुटीरवाद्यांनो हिंमत असेल तर, समोरासमोर स्टेजवर पुरावे घेऊन या!

 फुटीरवाद्यांनो हिंमत असेल तर, समोरासमोर स्टेजवर पुरावे घेऊन या!

नगरसेवक गणेश कवडे, संजय शेंडगेंचा हल्लाबोल...नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः दर निवडणूकीला पैशासाठी फुटणारे, रात्र-रात्र झिंगाट होणारे तुम्ही व तुमचे फुटीर साथीदार यांनी बालिशपणाचे बोलणे थांबवावे. मिडीया समोर बोलताना तरी तुमची रात्रीची उतरली होती का, ते पहा. तुमचे डोळे व तुमचा अवतार सर्व काही सांगतो. मागील व या निवडणूकीत आमच्या प्रभागामधुन सर्वाधिक मताधिक्य हे स्वर्गीय अनिल भैय्या यांनाच पडले. माझे तर जाहीर आवाहन आहे की, हिमंत असेल तर समोरा समोर स्टेजवर पुरावे घेऊन या, असे आवाहन नगरसेवक गणेश कवडे व संजय शेंडगे यांनी काका शेळके यांना दिले आहे.गेल्या काही दिवसांपासून नगर शहर शिवसेनेमध्ये फुट पाडण्याचे काम काही स्थानिक पदाधिकारी करत आहेत. सावेडी येथील काका शेळके यांनी राष्ट्रवादी सोडुन शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवसेनेने कुठलेही अधिकृत पद दिलेले नाही, ते स्वंयघोधित पदाधिकारी म्हणून स्वतःला मिरवीत आहेत. पक्षात फुट पाडण्याचा त्यांनी व त्यांच्या पक्षबदलु साथीदारांनी विडा उचलला असल्याचा आरोप नगरसेवक कवडे व शेंडगे यांनी केला आहे.

श्री कवडे पुढे म्हणाले की, वृत्तपत्राच्या माध्यमातून शेळके यांनी स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणूकीत मराठा समाजास विरोध दर्शविला. त्यावर आम्ही आक्षेप घेतला असता त्यांनी आमच्यावर व इतर नगरसेवक यांच्यावर विधानसभा निवडणूकीमध्ये पक्षविरोधी काम केल्याची टिमकी वाजवण्यास सुरुवात केली. परंतू त्या गोष्टीमध्ये कुठलेही तथ्य नाही, हे जनतेला माहिती आहे.
   काका शेळके यांचा शिवसेनेकडुन उमेदवारी मिळुन देखील तब्बल 1600 मतांनी तुमचा लाजिरवाणा पराभव झाला आणि आदरणीय अनिल भैय्यांना सर्वात कमी मते तुमच्या प्रभागात पडली. तरी निर्लज्जासारखे सावेडीत जास्त मते अनिल भैय्यांना पडली असे धादांत खोटे बोलत आहेत असा आरोप शेंडगे यांनी केला आहे. संपर्क प्रमुख व माझ्यात काही पदाधिकारी यांनी गैरसमज निर्माण केले होते. त्याची शहानिशा केल्यांनतर मी संपर्कप्रमुख यांची जाहीर माफी मागितली होती. त्यामुळे जुन्या विषयांना कितीही वाव देण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. आजवर आम्ही पक्षश्रेष्ठी व पक्षातील आदेशाचे,  नियमांचे पालन करत आलेलो आहोत. मातोश्रीवर फक्त निष्ठावंत शिवसैनिकांना स्थान आहे. आपल्यासारखे फुटीरवादीलोकांना तेथे प्रवेशही नाही याचे भान ठेवावे. ज्यांचा जन्म इतर पक्षात झाला आहे, ते सारसनगर, बुहाणनगर करून थकले आणि आता केडगावच्या नादी लागले. आमच्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिकांना वेळोवेळी फुटुन विष्ठा खाणार्‍यांनी आम्हाला हे शिकवू नये. तुम्ही स्वत:ला कट्टर शिवसैनिक म्हणतात. तुमचे शिवसेनेमध्ये योगदान व वयोमान किती? स्वत:ची वैचारीक पातळी व स्वत:ची ऊंची तपासावी. यापुढे कुठलेही चुकीचे पत्रक काढण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा तुम्हांला शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल याची खबरदारी घ्यावी, असा इशारा कवडे व शेंडगे यांनी दिला आहे.


No comments:

Post a Comment