आ. लंकेंच्या कार्यालयासमोर अनोखे आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 5, 2020

आ. लंकेंच्या कार्यालयासमोर अनोखे आंदोलन

 आ. लंकेंच्या कार्यालयासमोर अनोखे आंदोलन

लोककलावंताचे प्रश्न विधानसभेत सोडविणार ः आ. लंके

आ. लंके माणसातील देव ......
  आम्ही वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक प्रा . मार्तंड साठे यांच्या मार्गदर्शनाखाली  आमदार लंके यांच्या कार्यालयासमोर वारी मागो अंंदोलन करण्यासाठी आलो आमच्या मागण्या मांडल्या आमदार लंके यानी आमची आपुलकीने विचार पुस करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आमदार निलेश भाऊ आमचा खरा पाठीराखा तर माणसातला देव माणुस आहे आमच्या आयुष्यातील काही आयुष्य समाजसेवेसाठी या माणसाला देव माणसाला मिळावे.
दिपाली गायकवाड
    अध्यक्ष वाघ्या मुरळी परिषद, पारनेर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः वाघ्या मुरळी तसेच इतर कलावंतानी महाराष्ट्राची लोकसंस्कृति जोपासण्याचे काम केले. त्या कलेवर मिळणार्‍या मानधनावर या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो मात्र कोरोना आजाराच्या पार्श्वभुमिवर मार्च 2020 पासुन लॉक डाऊनमुळे सर्व कार्यक्रम बंद झाल्यामुळे या कलावंताना कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला आर्थिक अडचणीबरोबर वाघ्या मुरळी कलावंताचे अनेक प्रश्न आहेत त्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार संबधीत खात्याच्या मंत्र्यासोबत चर्चा करून सोडविण्याचा नक्की प्रयत्न करू असे आश्वासन आमदार निलेश लंके यानी दिले.
वाघ्या मुरळी राज्य परिषद पारनेर शाखेच्या वतीने पारनेर येथेआमदार निलेश लंके यांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी वारी मागो अंदोलन करण्यात आले त्यावेळी आंदोलन कर्त्याच्या निवेदनावर भाष्य करताना ते बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष संतोष गुळवे सचिव शांताराम शिंदे सरचिटणीस सागर साळुंके नाना गाडेकर दत्ता शिंदे पुनम मिसाळ नगर जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे आदिनाथ शिंदे संतोष शिंदे रवि शिंदे सागर साळुंके विलास शिंदे संदिप चिंचोलीकर यांच्यासह 100च्यावर वाघ्या मुरळी कलावंत उपस्थित होते.
   आमदार लंके पुढे बोलताना म्हणाले , की या लोककलावंताच्या अनेक अडचणी आहेत शासकिय दरबारी यांची नोंद नाही ती नोंद करून त्याना भविष्यकाळात आधार देण्याचे काम करू त्याना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही आमदार लंके यानी सांगितले.
वाघ्या मुरळी कलावंताना उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान मंजुर करावे, वाघ्या मुरळी लोककलेस शासन दरबारी मान्यता मिळवुन द्यावी मुलांमुलिच्या शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती द्यावी, जागेसह घरकुल योजना मिळावी कलावंताना पेन्शन योजना सुरू करावी मंदिरे खुली करावीत कार्यक्रमाना परवानगी द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या .
आंदोलनासाठी आलेल्या सर्व अंदोलन कर्त्याना आमदार लंके यांच्या वतीने चहा नाष्टा व्यवस्था करण्यात आली होती. या वारी मागो अंदोलनात कार्याध्यक्ष मधुकर पोळ, दत्ता जाधव  पारनेर तालुक्याचे सल्लागार संतोष भालेराव  संदीप सिताफळे प्रल्हाद ठाकरे परळी तालुका संघटक सुरेश जाधव तालुका निमंत्रक दत्ता शिंदे,  परशुराम मिसाळ समन्वयक सुभाष शिंदे, पुनम मिसाळ तसेच पारनेर तालुक्यातील नामांकित कलाकार कैलास गाडेकर, धनाजी शिंदे, माळसा गायकवाड, फुलाबाई गोफणे, बाळू धरम, विलास जाधव, अमित शिंदे, नागेश गायकवाड, सुखदेव गाडेकर, शिवाजी अटक, ज्ञानेश्वर शिंदे, कौशिक बांगर, रघुनाथ विर, सुमनबाई पोळ, बाळू वीर, रावसाहेब धरम, काशिनाथ शिंदे,  सोपान शिंदे, मच्छिंद्र शिंदे, निवृत्ती शिंदे, संदीप गोफणे, दादा भाऊ गाडेकर तसेच बाळासाहेब ठाणगे, संदीप शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment