ना. शंकरराव गडाखाचा चहाच्या टपरीवर संवाद... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 5, 2020

ना. शंकरराव गडाखाचा चहाच्या टपरीवर संवाद...

 ना. शंकरराव गडाखाचा चहाच्या टपरीवर संवाद...

मतदार संघात त्यांचे साधेपणाचे कौतुक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मंत्रिपद म्हंटलं कि गाड्यांचा मोठा ताफा.. सुरक्षा.. प्रशासकीय अधिकार्‍यांची लगबग.. असं सर्वसाधारण चित्र असताना राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख त्यांचे साधेपणामुळे जिल्ह्यात चर्चेत असतात.त्यांचे मतदारसंघात ते वावरत असताना कुठेही कोणी हात केला की थांबतात, चहाच्या टपरीवर थांबून चहा घेत गप्पा मारत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे.
    गडाख हे त्यांच्या साधेपणासाठी नावाजले जातात.साखर कारखाने, शिक्षण  संस्था असे मोठं वलय असले तरी गडाखांच्या वागण्याबोलण्यात अजिबात बडेजाव नसतो. आमदार असल्यापासून गावातील चहाची टपरी त्यांचे जनसंपर्क केंद्र आहे. आता मंत्री झाले तरी मित्रमंडळी समवेत ते साध्या चहाच्या टपरीवरच बसून गप्पा रंगवतात. असाच एक अनुभव सोशल मिडियावर मंत्री महोदयांनी शेअर केला आहे.
    तालुक्यात दौर्‍यावर असतांना निंभारी,  खुपटी मार्गे नेवासा शहरात जात असताना ज्ञानेश्वर मंदीर रोडवर  दिलीप चांदणे यांची चहाची टपरी आहे. तेथे माझी मित्र मंडळी भेटली. त्यावेळी तेथे चांदणे यांनी मोठ्या प्रेमानं आणि हक्काने चहा घेण्याचा आग्रह केला. तेथे त्यांच्या टपरीवर बसून माझ्या सर्व मित्रमंडळी सोबत चहाचा आनंद घेतला., अशा भावना गडाख यांनी व्यक्त केलेल्या आहेत. मंत्री साहेबांचा हा साधेपणा माणसं जोडणारा असल्याने सर्वांनाच त्यांचे नेहमीच कौतुक असते.

No comments:

Post a Comment